१३ तारीख संपली निवडणूक संपली, मी आता विखेंच्या विरोधात बोलणार नाही, खासदार लंकेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | POLITICS | GUARDIAN MINISTER RADHAKRISHNA VIKHE | MP NILESH LANKA | I WILL NO LONGER SPEAK AGAINST VIKHE, MP LANKA'S STATEMENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मी मंत्री विखेंचे आशीर्वाद घेणार, विखे कुटुंब जिल्ह्यातील मोठा परिवार, मला त्यांचा अभिमान आहे. मी अभिमानाने सांगतो दुग्ध विकास मंत्री माझ्या जिल्ह्यातला… हे उद्गार आहेत नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे आहेत. त्यांचा केडगाव येथे नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
“दुग्धविकास मंत्री माझ्या जिल्ह्याचा आहे हे मी अभिमानाने सांगतो”-निलेश लंके
निवडणुकीस मी सन्माननीय उमेदवाराच्या विरोधात उभा होतो. १३ तारीख संपली निवडणूक संपली आहे. आता मि त्यांच्या विरोधात बोलणे योग्य ठरणार नाही. निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या विरोधात बोलावेच लागते. त्या काळात माझ्याकडून एखादा शब्द गेला असेल, त्यांच्याकडूनही एखादा शब्द गेला असेल. पण निवडणूक संपल्यानंतर त्यांच्याविषयी बोलणे चुकीचे आहे. विखे परिवार जिल्ह्यातील मोठा परिवार आहे. आशिया खंडात पहिला साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभा केला होता. याचा मला अभिमान आहे. विखे कुटुंबाचे विकासात मोठे योगदान आहे. मी महाराष्ट्रभर फिरत असताना दुग्धविकास मंत्री माझ्या जिल्ह्याचा आहे हे मी अभिमानाने सांगतो.
उद्या जर माझे काही काम अडले तर मी आता हक्काने पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे गेले पाहिजे. राजकारणात कुणी कुणाचे शत्रू नसते. निवडणूक झाली की राजकीय द्वेष बाजूला सारला पाहिजे. सूडबुद्धीचे राजकारण आपल्याला बदलायचे आहे. याची सुरवात स्वतःपासून करावी लागणार आहे. त्यामुळे मी आता हा विरोध निवडणूक संपताच सोडून दिला आहे. निवडणुकींमधील विरोध, द्वेष हा त्याच वेळी सोडून दिला पाहिजे. मी देखील हा राग धरून चालणार नाही. अन्यथा जनता मलाही नाव ठेवेल. पुढे लंके म्हणाले आगामी काळात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आशीर्वाद मी घेणार आहे. माझे जे काही कामे असतील ते त्यांना सांगून ते मार्गी लावा अशी मदतही मागेल असे वक्तव्यही खासदार निलेश लंके यांनी केले आहे.