गीतेंची भूमिका शांत आता नाही होऊ शकत संभ्याचा अंत, गीतेंच्या असक्षम कारभारावर नागरिकांची खंत. ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MAHARASHTRA POLICE | AHMEDNAGAR DISTRICT | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | UPPER SUPERINTENDENT OF POLICE | TALUKA POLICE STATION | ILLEGAL BUSINESSES | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – अवैध धंद्यांच्या विक्रीने हाहाकार माजवला आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याचे मोठे साम्राज्य आहे हे नव्याने सांगणे गरजेचे नाही. पोलिसांना वारंवार तक्रारी प्राप्त होऊन देखील तालुका पोलीसांनी कोणत्याही अवैध धंद्यावर कारवाईची हिम्मत केली नाही. तालुका हद्दीत असलेल्या एका हॉटेलवर अनेक दिवसांपासून परप्रांतीय महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली हि बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून तालुका पोलीसांना याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे कारवाई शून्य प्रक्रियेतून स्पष्ट होते.
गीतेंची भूमिका शांत आता नाही होऊ शकत संभ्याचा अंत !
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार , वेश्याव्यवसाय , गुटखा विक्री सारखे अनेक अवैध धंदे जोरात सुरु आहे. मोठ्या प्रमाणात चोऱ्या दरोडे पडणे हे तालुका हद्दीला नवीन नाही. मात्र तालुका पोलीस ठाण्याला निरीक्षक नवीन लाभले आहेत. काही दिवसांपासून प्रल्हाद गीतेंनी कारभार स्विकारला आहे. गीतेंच आगमन होताच अवैध कारभार बंद होण्याचे वातावरण पसरले होते. काही अवैध धंदे चालकांनी आपला कारभार बंद करण्याचे देखील ठरवले होते. मात्र काही दिवसांतच असा प्रकार घडला कि अवैध धंदे बंद न होता अजून मोठ्या प्रमाणात धंदे वाढले आहेत. गीतेंकडून असलेल्या नागरिकांच्या वैध अपेक्षा या आता अवैध ठरत असल्याची चिंता स्थानिक नागरिक खासगीत व्यक्त करत आहेत.मात्र गीते या विषयाकडे गांभीर्याने पाहत नसून गीतेंचा या विषयात काही लोभ आहे का ? हि बाब शंका निर्माण करत आहे. गीते जर कारवाई करत नसतील तर अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे गीतेंची उचलबांगडी करण्याची हिम्मत दाखवतील का असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
कमल्याचा अंत , मात्र संभ्या जिवंत ?
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना कमल्या नामक एक व्यक्ती मदत करत होता. कमल्याच्या बाबतीत तक्रारी प्राप्त होताच कमाल्याने आपला मोर्चा दुसरीकडे वळवत शहाणपणा दाखवला लक्ष्मींच्या नादी अन साहेबांच्या आधीन आपले नुकसान होणार असल्याने कमल्याने पळ काढला. मात्र या अवैध धंद्यांना संभ्या नामक पंटर चालवत आहे. अवैध धंदे चालकांकडून संभ्या भली मोठी रक्कम वसूल करत आहे. हि रक्कम संभ्या कोणासाठी व कशासाठी घेत आहे. याची माहिती घेण्यासाठी टाईम्स ऑफ अहमदनगरने प्रयत्न केला. यावेळी टाईम्स ऑफ अहमदनगरला सूत्रांनी धक्कादायक माहिती दिली संभ्या नामक एक व्यक्ती हा पोलीस अधिकाऱ्यांच्या नावावर लक्ष्मी जमा करत आहे. या यादीमध्ये हद्दीचे,शहराचे व जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आणि आकडे समोर आले आहे.