रुपेश पसपुल डान्स फिटनेस स्टुडिओ तर्फे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. मागील बारा वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर रुपेश पसपुल डान्स फिटनेस स्टुडीओने तेराव्या वर्षात पदार्पण केले आहे. ११ एप्रिल २०२४ ते ११ मे २०२४ पर्यंत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कलाकारांना नवीन कला शिकतायावी यासाठी दरवर्षी नृत्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येते.
कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी या प्रत्येक वर्षी शिबिराचे आयोजन केले जाते. शिबिरामध्ये कलाकारांना सांघिक कौशल्य , व्यक्तिमत्व विकास , पर्यावरण पूरक अभ्यासक्रम, सह इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक यांचे व्याख्यान विध्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा वाढवा अभ्यास कसा करावा आपलं व्यक्तिमत्व कसं फुलवावं याबद्दल मार्गदर्शन देखील या शिबिरामध्ये केले जाणार आहे. तसेच दर रविवारी विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संचालक रुपेश पसपुल यांनी टाईम्स ऑफ अहमदनगरशी बोलतांना दिली.
शिबिराचे नियोजन.
शिबिराची वेळ सकाळी ८ ते ११ असणार आहे. हे शिबीर रोज तीन तास चालणारआहे. नृत्य प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी नृत्य अभिनय , लाठीकाठी, संस्कारक्षम कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच विध्यार्थ्यांसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी देखील सहलीचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. या शिबिराचे तेराव्वे वर्ष असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संचालक रुपेश पसपुल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9511863900