सलमान खानला बायको नाही , मुलं नाहीत , मग ४००० कोटींची संपत्ती आता यांच्या नावावर होणार ………
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | BOLLYWOOD | ACTOR SALMAN KHAN | SALIM KHAN | ARBAAZ KHAN | SOHAIL KHAN | SALMAN KHAN WEALTH NEWS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. मागील महिन्यात मुंबईतील सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामागे बिष्णोई गँगचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय, सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या सगळ्या गदारोळात सलमान खानच्या संपत्तीची वाटणी करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार, सलमान खानच्या संपत्तीचे चार हिस्से होऊ शकतात.
स्त्रोत.सोशल मिडिया.
सलमान खानची ४००० कोटी रुपयांची संपत्ती.
सलमान खानच्या संपत्तीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सलमान खानची ४००० कोटी रुपयांची संपत्ती चार लोकांमध्ये विभागली जाणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांनी अरबाजच्या मुलाच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सलमान खान हा एकटाच राहत असल्याचे म्हटले होते.
स्त्रोत.सोशल मिडिया.
चारही हिस्से कुटुंबातील लोकांमध्ये वाटले जाणार आहेत.
सलमान खान हा अविवाहित आहे. त्याने कोणतेही मुलं दत्तकही घेतले नाहीत. त्यामुळे सलमानची संपत्ती कोणाच्या वाटेला जाणार, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. ‘क्राइम तक’ या पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानच्या संपत्तीचे चार हिस्से होणार आहेत. हे चारही हिस्से कुटुंबातील लोकांमध्ये वाटले जाणार आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
सलमान खान हा बिईंग ह्युमन या आपल्या एनजीओच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात देत असतो.
सलमान खानला अरबाज खान आणि सोहेल खान शिवाय अलविरा खान आणि अर्पिता खान या दोन बहिणी आहेत. या भावंडांमध्ये खूप प्रेम आहे. जर दुर्देवाने सलमानला काही झाल्यास त्याच्या संपत्तीवर भाऊ आणि बहिणींचा अधिकार असल्याचे वृत्त आहे. तर काही भाग सलमान खानची एनजीओ बिईंग ह्युमनला देणगी म्हणून दिली जाण्याची शक्यता आहे. सलमान खान हा बिईंग ह्युमन या आपल्या एनजीओच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात देत असतो. अनेकांना शस्त्रक्रिया, औषधोपचारासाठी त्याने मदत केली आहे.