शिवराष्ट्र सेना आक्रमक , कालचा एक पत्रकाराच्या मारहाणीचा थरार पाहिल्याने पोटात गोळा उठल्याशिवाय राहणार नाही. – संतोष नवसुपे
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | JOURNALIST BEATEN IN AHMEDNAGAR CITY | BEATEN BY A POLITICIAN | SHIV RASHTRA SENA | SANTOSH NAVSUPE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
शहरात रविवारी (१२ मे) रोजी मंगलगेट कोठला येथे दोन गटात मारहाण झाली होती. या वेळी सचिन नामक एका व्यक्तीला काही पोरांकडून चोप देण्यात आला होता.निवडणुकांचे वातावरण असल्यामुळे शहरातली शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांच्या त्वरित उपलब्धतेमुळे वातावरण चिघळले नाही. सचिन नामक त्या व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला सचिनने लाथ मारली होती. सचिनने लाथ मारताच जमावाने पत्रकारावर हल्ला चढवला होता.
शिवराष्ट्रसेनेचे संतोष नवसुपेंचा संदेश व्हायरल.
शिवराष्ट्र सेना महाराष्ट्र राज्य
पत्रकार बंधुंनो आपणाला लाथ, म्हणजे नगर च्या सुरक्षेला तडा रक्ताच्या उलट्या,व पोट दुखणं न थांबल्याने पत्रकार बंधुं अँडमिट.
कालचा एक पत्रकाराच्या मारहाणीचा थरार पाहिल्याने पोटात गोळा उठल्याशिवाय राहणार नाही. सामान्य नागरिकांनी नेमके नगर शहरात स्वसंरक्षणासाठी हाक द्यायची कुणाला असा प्रश्न गरीब व सामान्य कुटुंबाला पडला आहे.या ठिकाणी पत्रकाराच्या पोटात लाथ, पोलीसांच्या घरात चो-या हे लोकच सुरक्षीत नाही. दिवसा ढवळ्या महिलांना मारहाण होते, बलात्कार होतात व पीडितांना न्याय मिळत नाही. लोकप्रतिनिधी पत्रकाराला लाथ मारत असतील तर सामान्य नागरिकांनी अन्याय झाल्यावर न्याय कुणाला मागायचा हा सवाल आज प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे तरी झालेल्या घटणेचा शिव राष्ट्र सेना निषेध करत आहे व पत्रकार बंधुंच्या मागे उभा राहत आहे. असे म्हणत पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध त्यांनी व्यक्त केला आहे.