By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍या जाहिरात एजन्सी विरूध्द कायदेशीर कारवाई – आयुक्त डॉ. पंकज जावळे
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍या जाहिरात एजन्सी विरूध्द कायदेशीर कारवाई – आयुक्त डॉ. पंकज जावळे
अहमदनगर

अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍या जाहिरात एजन्सी विरूध्द कायदेशीर कारवाई – आयुक्त डॉ. पंकज जावळे

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR MUNICIPAL CORPORATION | ARTILLERY POLICE STATION | COMMISSIONER DR. PANKAJ JAWLE | ADDITIONAL COMMISSIONER JOSHI | COMMISSIONER DR. ORDERED THAT CRIMES SHOULD BE FILED IMMEDIATELY ON UNAUTHORIZED HOARDINGS. GIVEN BY PANKAJ JAWLE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/13 at 4:21 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अहमदनगर- गेल्या काही दिवसांत केवळ नऊ होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या ८३ अनधिकृत होर्डिंग्जबाबत तात्काळ पडताळणी करून २५ जूनपर्यंत ते काढून घ्यावेत. सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. असे आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू आहे. आयुक्त जावळे यांनी या कारवाईचा आढावा घेतला आहे. शहरात ३८४ अधिकृत होर्डिंग्ज असून या सर्वांचे स्ट्रक्चरल ऑडिट दोन दिवसांत पूर्ण करा.

सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यासाठी 25 जूनची मुदतस्त्रोत सोशल मिडिया 

महानगरपालिका अनधिकृत होर्डिंग्जवर गुन्हे दाखल करणार…

अनधिकृत आढळलेल्या ८३ होर्डिंग्जपैकी ज्यांच्या परवान्याचे अर्ज प्रलंबित आहेत ते १४ जूनपर्यंत निकाली काढावेत. ज्याची परवानगी देता येणार नाही ते अर्ज नामंजूर करा. त्यानंतर उर्वरित अनधिकृत होर्डिंग्जवर गुन्हे दाखल करावेत. सध्या सुरू असलेली कारवाई अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्याला गती द्यावी. कोणत्याही परिस्थितीत २५ जूनअखेर सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून घ्यावेत. असे आदेश आयुक्त जावळे यांनी दिले आहेत. होर्डिंग्ज परवाना नुतनीकरणाचे तसेच नवीन होर्डिंग्जसाठीचे अर्ज प्रलंबित ठेवणे, अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याच्या कारवाईवेळी नुतनीकरण व परवानगीसाठी आलेल्या अर्जाची माहिती उपलब्ध करून न देणे, अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍या जाहिरात एजन्सी विरूध्द कायदेशीर कारवाई न केल्याने प्रशासक जावळे यांनी जाहिरात विभाग प्रमुख सुबोध देशमुख यांना कारवाईची नोटीस बजावली आहे.

नगर : तोफखान्याची 'डिटेक्शन ब्रँच' 'कलेक्शन' मोडवर | पुढारीस्त्रोत सोशल मिडिया 

नगर-मनमाड रस्त्यावरील अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद.

शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणात उभ्या असलेल्या टॉवर संदर्भात नगररचना विभागाकडून माहिती मागविण्यात आली आहे. तसेच शहरातील अनधिकृत व मुदत संपलेल्या गॅन्ट्री काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याबाबतही लवकरच कारवाई सुरू होईल असे अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी सांगितले आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील एका अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी महापालिकेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाहिरात विभागाचे सुबोध विनायक देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ जून रोजी रात्री महापालिकेने हे होर्डिंग्ज कारवाई करून हटवले होते. या प्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अभिनेता सलमान खानची चार तास चौकशी, सलमान खान त्या प्रकरणाला वैतागला….
Next Article आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही निवडणुकीत उतरून २८८ मतदानसंघात नाव घेऊन उमेदवार पाडू जरांगेंचा थेट इशारा.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?