नगरमधील दोन कॅफेवर तोफखाना पोलिसांचा छापा, कॅफेच्या नावाखाली शाळा व कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | SAVEDI | ARTILLERY POLICE | TOFKHANA POLICE | RAIDED TWO CAFES AND REGISTERED CASES AGAINST THE CAFE OPERATORS | THE TOFKHANA POLICE HAD RECEIVED INFORMATION THAT SEATS WERE BEING MADE AVAILABLE TO SCHOOL AND COLLEGE BOYS AND GIRLS IN THE CAFE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर – शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या सावेडी उपनगरातील दोन कॅफेवर तोफखाना पोलिसांनी छापेमारी करत कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तेथे अश्लील चाळे करताना पकडलेल्या मुला-मुलींना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले आहे. शहरातील मनमाड रस्त्यावरील डौले रुग्णालयजवळील स्टेला कॅफेत शाळा व महाविद्यालयीन मुला-मुलींना जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सोमवारी छापा टाकला असता कॅफेमालक अंजिक्य बाळासाहेब कोतकर (वय २०, रा. कोतकर मळा, केडगाव) हा पोलिसांच्या हाती लागला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
दोन्ही कॅफेचे मालक पोलिसांच्या ताब्यात….
कॅफेच्या नावाखाली प्लायवुडचे कम्पार्टमेंट करून, पडदे लावून अंधार करून मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळण्यात आले आहे. अजिंक्य कोतकरला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड रस्त्यावरीलच बॉलिवूड कॅफेतही तोफखाना पोलिसांनी काल मंगळवारी दुपारी छापा टाकला होता. तेथे कॅफेचा मालक सुमित भाऊसाहेब ठोंबे (वय १८, रा. अरणगाव, नगर) आढळला आहे. त्यानेही अशीच जागा उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या पथकाने केली आहे.