शहरातील बंद पडलेले सिग्नल सुरु करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा – किरण रोकडे
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | MNS | CITY VICE PRESIDENT KIRAN ROKDE | A STATEMENT HAS BEEN GIVEN TO COMMISSIONER SHRIKANT PAWAR TO TURN ON THE SIGNAL AT THE SQUARE IN THE CITY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर शहरातील सर्व चौकातील सिग्नल चालू करा न झाल्यास मनसे तर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे यांनी सांगितले आहे. नगर शहरातील मुख्य चौकामध्ये सिग्नल बंद झाले आहे. नगर मधील सर्वच महत्त्वाचे रस्ते हे कायमच गर्दीने गजबजलेले असतात तेथील सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी सिग्नल बंद आहेत त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नसतात. सिग्नल बंद असल्यामुळे ट्राफिकचे नियोजन व्यवस्थित होत नाही अनेक अवजड वाहने मोठ्या वेगाने शहरात फिरत असतात. भविष्यात महत्त्वाच्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात त्यामुळे तेथील सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर चालू करावी यासाठी मनसे तर्फे आज आयुक्त श्रीकांत पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
आयुक्त श्रीकांत पवार यांना निवेदन….
यावेळी शहर उपाध्यक्ष किरण रोकडे, संकेत पाळंदे, नितीन जायभाय, मोहित कुलकर्णी, समर्थ मु्र्तडक, ओम जगताप, ऋषी सोनवणे, स्वप्निल वारे, योगेश तांदळे, प्रतीक कदम हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सिग्नल यंत्रणा चालु न केल्यास मनसे शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे सांगितले किरण रोकडे यांनी सांगितले आहे.