By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: विखेंबद्दल खासदार निलेश लंकेंच्या बदललेल्या भूमिकेची जिल्ह्यातच नाही, तर राज्यात चर्चा…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > विखेंबद्दल खासदार निलेश लंकेंच्या बदललेल्या भूमिकेची जिल्ह्यातच नाही, तर राज्यात चर्चा…..
अहमदनगर

विखेंबद्दल खासदार निलेश लंकेंच्या बदललेल्या भूमिकेची जिल्ह्यातच नाही, तर राज्यात चर्चा…..

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR POLITICS | MP NILESH LANKA | FORMER MP SUJAY VIKHE | YASHWANTRAO GADAKH BALASAHEB VIKHE 1991 ELECTION VIKHE VS GADAKH | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/24 at 6:23 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

नगर जिल्ह्यातील राजकारणात गेल्या दोन-तीन वर्षांत विखे – लंके वादाने परिसिमा गाठली होती. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे अगदी कार्यकर्त्यांच्या हमरी-तुमरीपर्यंत प्रकरण आले होते. ठरल्याप्रमाणे लंकेंनी विखेंविरोधात निवडणूक लढवली आणि जिंकलीही. निकालानंतरही १५ दिवस या दोहोंतील विळ्या-भोपळ्याचे नाते कायम राहिले होते. पण दोन दिवासांपूर्वी लंकेंचा मूड बदलला आणि त्यांनी अचानक विखेंचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. मोठ्या विखे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जायचेय, असेही सांगितले आहे. लंकेंचा बदललेला मूड मेन स्ट्रिम मीडियाने व सोशल मीडियाने काही मिनिटांत राज्यभर नेला आहे. लंके व विखे या दोन्हींच्या कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली आहे. या धक्क्यानंतर लगोलग दुसरा धक्का बसला, तो म्हणजे विखेंनी ४० केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची न्यायालयाकडे केलेल्या मागणीने या अगोदर विरोधक ईव्हीएमवर आक्षेप घ्यायचे. मात्र आता भाजपचे उमेदवार विखेंनीच पहिल्यांदा आक्षेप घेतल्याने चर्चा झाली आहे.

उद्धव ठाकरे से मुलाकात के बाद नीलेश लंके ने किया ऐलान, अहमदनगर की सभी 12 सीटें जीतेगी महाविकास आघाडीस्त्रोत सोशल मिडिया

खासदार लंकेंची बदललेली भाषा….

आक्रमक समजल्या जाणाऱ्या लंकेंची नरमाईची भूमिका आणि विखेंची निवडणूक आयोगाकडे धाव, या दोन्ही घटनांचा ताळमेळ लावने अवघड झाले आहे. मात्र या प्रकारामुळे १९९१ च्या विखे-गडाख निवडणुकीची प्रकर्षाने आठवण होत आहे. खरेच व्हिव्हिपॅटमध्ये काही बिघाड असेल का ? मशिनमध्ये काही झोल असेल का ?  विखेंच्या निर्णयाचा धसका घेतल्यामुळेच लंकेंची भाषा बदलली असेल का ? हे सगळे प्रश्न यानिमित्ताने पडले आहेत. या सगळ्या प्रकारानंतर मात्र जुन्या-जाणत्या नगरकरांना आठवली ती १९९१ ची निवडणूक. आता विखे-गडाख हे प्रकरण नेमके काय होते ते आपण जाणून घेवूयात.

vikhe patil gadakh code of conduct case information | विखे-गडाख खटल्यानंतरच राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी - Ahmednagar News | Divya Marathiस्त्रोत सोशल मिडिया 

१९९१ ची निवडणूक विखे विरुद्ध गडाख….

नगर मतदारसंघात १९९१ साली काँग्रेसचे उमेदवार होते यशवंतराव गडाख तर त्यांच्या विरोधात होते अपक्ष बाळासाहेब विखे पाटील. या निवडणुकीचा १६ जून रोजी निकाल लागला होता. त्यात गडाख २.७९ लाख मतांनी विजयी झाले होते. या निकालाला विखेंनी ओरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. गडाख यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याने लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२३(४) अन्वये त्यांची निवड अवैध ठरवून आपल्याला विजयी घोषित करावे, अशी त्यांची याचिका होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावरही विखेंनी चारित्र्यहननाचा आरोप केला होता. विखेंनी याचिकेत या दोघांच्या भाषणाचे पुरावेही जोडले होते.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अहमदनगर बाह्यवळण रस्त्यावर तीन मोठ्या वाहनांचा भीषण अपघात, तीन जन जागीच ठार तर एक गंभीर जखमी.
Next Article अहमदनगरमधील एका अल्पवयीन तरुणीसोबत एका तरुणाने भर रस्त्यात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करत तिला….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?