By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणांमध्ये डॉक्टर निलेश शेळके याला अटक, घोटाळ्यात अनेक आजी-माजी संचालकांचा समावेश.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणांमध्ये डॉक्टर निलेश शेळके याला अटक, घोटाळ्यात अनेक आजी-माजी संचालकांचा समावेश.
अहमदनगर

नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणांमध्ये डॉक्टर निलेश शेळके याला अटक, घोटाळ्यात अनेक आजी-माजी संचालकांचा समावेश.

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | NAGAR URBAN BANK | NAGAR URBAN BANK SCAM | DOCTOR NILESH SHELKE ARRESTED | MANY DIRECTORS INVOLVED IN THE SCAM | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/26 at 12:04 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
xr:d:DAGBv3nRG3k:32,j:7645284827233214844,t:24041019
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणांमध्ये डॉक्टर निलेश शेळके याला अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शेळके याला दिनांक २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस उपधीक्षक अमोल भारती यांनी तपास सुरू केल्यानंतर फॉरेन्सिक अहवालामध्ये डॉक्टर निलेश शेळके यांचा कशा पद्धतीने सहभाग आलेला आहे हे सिद्ध झाले आहे. शेळके यांच्या बँकेच्या खात्यावर १० कोटी रुपयांची रक्कम परस्परित्या कशा पद्धतीने आली तसेच इतर काही बाबी तपासामधून आढळून आल्यानंतर काल डॉक्टर शेळके याला काल अटक करण्यात आली आहे. काल त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे.

Are you also unable to save money, So follow these tips, will save a lot of money | क्या आप भी नहीं कर पाते पैसों की बचत? तो अपनाएं ये टिप्स, बचेगास्त्रोत सोशल मिडिया

शेळके यांच्या खात्यामध्ये दहा कोटी रुपये कुठून आले ? 

डॉक्टर शेळकेला न्यायालयामध्ये हजर केले असता सरकारी पक्षाच्या वतीने घडलेला गुन्हा हा अतिशय मोठा आहे. दोनशे ते चारशे कोटी रुपयांचा घोटाळा आहे ,या प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहे. या अगोदर पोलिसांनी काही संचालकांना तसेच बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. डॉक्टर शेळके यांच्या खात्यामध्ये दहा कोटी रुपये परस्परित्या जमा झालेले आहेत. नेमके हे कुठून कसे आले याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे. तसेच त्याच्यात अजून कोण कोण सामील आहे. याची सुद्धा पोलिसांना माहिती घ्यायची आहे गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे तसेच कागदपत्रांची पडताळणी ही करणे अजून बाकी आहे. आरोपी हा तपासात कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार नाही. त्यामुळे आम्हाला या प्रकरणाचा तपास करायचा असल्यामुळे तसेच इतर बाबी सुद्धा फोरेन्सिक ऑडिटमध्ये आलेले आहेत. त्या सुद्धा लक्षात घेऊन आम्हाला तपास करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद न्यायालयामध्ये केला आहे. तर आरोपी शेळके यांच्या वतीने माझ्या या गुन्ह्याशी काही संबंध नाही विनाकारण मला अटक आलेले आहे यासह विविध मुद्दे युक्तीवादामध्ये त्याच्या वकिलामार्फत मांडले न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर डॉक्टर शेळके याला दिनांक २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Increase in difficulty of Nagar Urban Multistate Bank; Depositors, account holders remain frustrated | आरबीआयने निर्बंध वाढवले: नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या अडचणीत वाढ; ठेवीदार ...स्त्रोत सोशल मिडिया 

गुन्ह्यामध्ये अनेक आजी-माजी संचालकांचा समावेश….

नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्याची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहे काही संचालकांना या अगोदर अटक करण्यात आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत कोतवली पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये डॉक्टर शेळके याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्या खात्यावर परस्परित्या पैसे जमा झालेले आहेत वास्तविक पाहता या अगोदर सुद्धा डॉक्टर शेळके याला फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली होती. त्यावेळेला सुद्धा अनेक बाबी या उजेडात आलेल्या होत्या त्यामुळे कशा पद्धतीने हा गुन्हा केला हे आता लवकरच उलगडला आहे तसेच या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलिसांनी आता फॉरेन्सिक ऑडिटचा विषय हाती घेतला असून यामध्ये अनेक आजी-माजी संचालकांचा समावेश आहे गेल्या चार-पाच महिन्यापासून अनेक आजी-माजी संचालक हे नगरमध्ये नसून ते फरार झालेले आहेत पोलीस त्यांच्या सुद्धा शोध घेत आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article नगरमध्ये अल्पवयीन मुलांना जबरदस्त मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड, घरातील महिलांनाही…
Next Article नगरमध्ये अनेक प्रकारच्या होणाऱ्या अवैध धंद्यांवर एक्साईज विभागाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचा संतापजनक सवाल.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?