By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: खासदार निलेश लंके दिल्लीत अ‍ॅटो रिक्षामधून शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीतही लंकेंच्या साधेपणाचे कौतुक…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > देश-विदेश > खासदार निलेश लंके दिल्लीत अ‍ॅटो रिक्षामधून शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीतही लंकेंच्या साधेपणाचे कौतुक…..
देश-विदेश

खासदार निलेश लंके दिल्लीत अ‍ॅटो रिक्षामधून शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीतही लंकेंच्या साधेपणाचे कौतुक…..

TIMES OF AHMEDNAGAR | DELHI | MAHARASHTRA SADAN | NCP SHARAD CHANDRA PAWAR PARTY PRESIDENT SHARAD PAWAR | MP NILESH LANKA | LANKA'S JOURNEY IN DELHI BY AUTO RICKSHAW | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/27 at 11:29 AM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

बुधवारी सकाळी महाराष्ट्र सदनमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी नगरचे खासदार नीलेश लंके हे चक्क अ‍ॅटो रिक्षामधून प्रवास करीत पोहचले. महाराष्ट्र सदनमध्ये खासदार लंके यांच्यासाठी एक खोली देण्यात आली असून तिथे शपथविधीसाठी दिल्लीत आलेल्या महिलांची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे लंके हे हॉटेलमध्ये वास्तव्यास असून बुधवारी सकाळी शरद पवार यांच्या भेटीचा निरोप मिळाल्यानंतर वाहन उपलब्ध नसल्याने लंके यांनी अ‍ॅटो रिक्षाने महाराष्ट्र भवनापर्यंत पोहचण्याचा पर्याय स्विकारला. गळयात संसद सदस्याचे ओळखपत्र असलेल्या व्यक्तीने संसद भवनापर्यंत सोडण्याची सुचना केल्यानंतर अ‍ॅटोचालकही आचंबित झाला होता. त्याने खासदार निलेश लंके यांना आदराने महाराष्ट्र भवनापर्यंत पोहचविण्याची तयारी दर्शविली. लंके हे महाराष्ट्र सदनापर्यंत अ‍ॅटो रिक्षाने पोहचल्याचे तिथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील नेते तसेच कार्यकर्त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनीही तोंडात बोट घातले होते.

खा. निलेश लंके यांचा साधेपणा दिल्लीकरांना भावला... चक्क ॲटो रिक्षातून प्रवास ....स्त्रोत सोशल मिडिया 

खासदार लंके दिल्लीत अ‍ॅटो रिक्षाने महाराष्ट्र भवनापर्यंत….

दिल्ली येथे नीलेश लंके यांच्यासाठी सध्या वाहनाची व्यवस्था नाही. खासदार सुप्रिया सुळे यांचे वाहन त्या वापरतात. मात्र शरद पवार यांच्या भेटीचा निरोप आला त्यावेळी लंके यांच्याजवळ एकही वाहन नव्हते. त्यांनी हॉटेलबाहेर येत थेट रिक्षाला हात करून महाराष्ट्र भवन लवकरात लवकर जवळ करण्याचा निर्णय घेतला.
लंके हे सन २०१९ मध्ये आमदार झाले होते. मात्र त्यानंतरही त्यांचा साधेपणा नेहमीच अनुभवण्यास मिळाला आहे. अनेकदा त्यांनी दुचाकीवरून प्रवास केला आहे. कधी मारूती ओमीनी तर कधी मारूती ८०० कारमध्येे प्रवास करतानाही त्यांना अनेकांनी पाहिले आहे. मुंबईत आमदार निवासमध्ये लंके यांनी नेहमीच जमीनीवर झोपणे पसंत केले आहे. कोव्हीड सेंटरमध्येही हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत जमीनीवर झोपल्याची अनेक छायाचित्रे सोशल मिडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

You Might Also Like

एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय १७१ हे विमान कोसळलं ; विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला आई ढसाढसा रडत म्हणाली…..

चक्क दात घासण्याच्या ब्रशमुळे पतीचं लफडं उघड ; दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन…

चार विवाहित मुलांची आई सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार…..

….तर बलात्काराचा खटला करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. !

मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवले जाणार मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा ; यापूर्वी हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण शिकवण्याची केली होती मागणी…….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबाबत यूट्यूबर अरमान मलिकचे मोठे वक्तव्य, सिद्धार्थच्या चाहत्यांनी केला संताप व्यक्त….
Next Article आतिकच्या आर्थिक आशीर्वादाने तरुणाईच्या डोक्यावर कॅन्सरचे ताज, दीपक दादा नाही जनाची तर मनाची तरी बाळगा लाज !
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?