By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: विधासनभा निवडणूकीसाठी “याच” नेत्याला तिकीट द्या, अन्यथा राजीनामा देईल – शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > विधासनभा निवडणूकीसाठी “याच” नेत्याला तिकीट द्या, अन्यथा राजीनामा देईल – शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके
अहमदनगर

विधासनभा निवडणूकीसाठी “याच” नेत्याला तिकीट द्या, अन्यथा राजीनामा देईल – शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | LEGISLATIVE ASSEMBLY ELECTION | SHARAD CHANDRA PAWAR GROUP | DISTRICT PRESIDENT RAJENDRA PHALKE SHARAD PAWAR GROUP | A BIG STATEMENT BY RAJENDRA PHALKE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/29 at 2:53 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अहमदनगर – आगामी विधासभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्ष आता आपापल्या पद्धतीने आगामी नियोजन करू लागले आहे. लोकसभेच्या यशानंतर शरद पवार गट आता जोमाने कामाला लागला असून अहमदनगरमधील रणनीती आखली जात आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मोठे विधान केले आहे. आगामी विधासनभा निवडणूकीसाठी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून अॅड. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी द्यावे. त्यासाठी आपण आग्रही आहोत, जर तसेच झाले नाही तर, पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला आहे.

नगर दक्षिण लोकसभा राष्ट्रवादीचं लढवणार : राजेंद्र फाळके | Sarkarnamaस्त्रोत सोशल मिडिया 

जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे मोठे विधान….

खासदार नीलेश लंके यांच्या विजयासाठी अॅड. ढाकणे यांनी जिवाचे रान केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे. मिळालेले यश प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाचे फळ आहे, असे फाळके म्हणाले आहेत. शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणी निवडीच्या संदर्भात शुक्रवारी (ता. २८) शेवगाव येथे मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशचे सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, शेवगाव तालुकाध्यक्ष हरिश भारदे, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्यांनी दहा वर्षांचा लेखाजोखा मांडावा. टक्केवारीमुळे रस्त्याची गुणवत्ता राहिली नाही. सहा महिन्यात रस्ते फुटायला लागलेत, टक्केवारीच्या घोळामुळे शेवगाव पाणी योजनेसह मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मतदार संघातील प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे २ जुलैपासून आपण शेवगाव, पाथर्डी मतदारसंघातील गावांमध्ये शिवार यात्रा काढणारा असून, त्यात वाड्यावस्त्यांवर फिरून घोंगडी बैठका घेत सर्व प्रश्न समजून घेणार आहोत. जनतेने संधी दिली तर आमदार कसा असतो, हे दाखवून देईन, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशचे सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी केले आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad0
Happy1
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article जोपर्यंत ड्रग्ज मुक्त शहरे होत नाहीत, तोपर्यंत बुलढोझर कारवाई सुरु राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
Next Article राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात सभागृहात एकमेकांविरूद्ध झाले चांगलेच आक्रमक….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?