खासदार निलेश लंकेंच्या समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून सुजय विखेंना डिवचले, डोन्ट अंडर एस्टीमेट द…..
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | POLITICS | MP NILESH LANKE | FORMER MP SUJAY VIKHE | NILESH LANKE'S SUPPORTERS HAVE DISTURBED SUJAY VIKHE BY PUTTING UP A BANNER IN ENGLISH | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली होती. शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. सुजय विखेंचा पराभव करुन निलेश लंके हे जायंट किलर ठरले आहेत. तर अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचारही राज्यभरात गाजला होता. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर इंग्रजी भाषेवरुन टीका केली होती. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपथ घेऊन सुजय विखे पाटलांना प्रत्युत्तर दिले होते. आता निलेश लंकेंच्या समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून सुजय विखेंना डिवचले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
खासदार लंकेंच्या समर्थकांनी लावले इंग्रजीत बॅनर…
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचे आव्हान दिले होते. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. निलेश लंके यांनी सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असे प्रत्युतर निलेश लंके यांनी दिले होते. त्यांनतर संसदेत इंग्रजी भाषेत खासदारकीची शपथ घेऊन निलेश लंके यांनी विखे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते. आता निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या कार्यालयासमोर इंग्रजीत बॅनर लावून एकप्रकारे टीकेला उत्तर दिले आहे. या बॅनरवर ‘आय निलेश ज्ञानदेव लंके, डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन, अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरु आहे. आता या बॅनरवरून लंके समर्थकांकडून काय प्रत्युत्तर येणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.