सर्वसामान्यांच्या पाठीशी मी उभा आहे,अडीअडचणी निर्माण झाल्यास तात्काळ संपर्क करा : आमदार संग्राम जगताप
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | MLA SANGRAM JAGTAP NEWS | MLA SANGRAM JAGTAP HELD A MEETING OF ENTREPRENEURS | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर : आमीच्या पुढाकारातून आमदार संग्राम जगताप यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी गुंडगिरी व अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आमदार जगतापांकडे केली आहे. गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी देखील उद्योजकांनी लावून धरली आहे.एमआयडीसीमध्ये अवैध धंदे चालविणारे अनाधिकृत टपऱ्या वाढल्या असताना गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या टपऱ्यांमध्ये दारू, चरस, गांजा, असे अमली पदार्थ विकले जातात. त्याचे सेवन करून गुन्हेगारीचे प्रमाण या परिसरात वाढत आहे. या सर्वांमुळे एमआयडीसीमधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील गंभीर झाला असल्याचे उद्योजकांनी म्हंटले केले.
(संग्रहित दृश्य.)
एमआयडीसीमध्ये कामासाठी येणाऱ्या परप्रांतीय लोकांना त्रास ?
एमआयडीसीत कंपन्यातून चोऱ्यांच्या घटना सर्रासपणे घडत आहे. विशेषतः बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये वारंवार चोऱ्या होत आहेत. नुकतेच कामावरून परतणाऱ्या तीन कामगारांना रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली होती. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसीमध्ये कामासाठी येणाऱ्या परप्रांतीय लोकांना रात्री दारू पिऊन काही टवाळखोर त्रास देत आहेत. त्याचा बंदोबस्त करा तसेच एमआयडीसीसाठी तीन गावांच्या ग्रामपंचायती आहेत. त्यांचा मालमत्ता कर वेगवेगळ्या तीन गावांकडून मिळत आहे. असे असतांना एकच मालमत्ता कर लागू करावा. एमआयडीसीसाठी एमएसईबीचे सबस्टेशन मंजूर आहे. परंतु जागे अभावी सबस्टेशन होत नाही. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. सनफार्मा चौक ते निंबळक बायपास रस्त्याची खूप दुरावस्था झाली असून, तो रस्ता दुरुस्त करावा. अपघात टाळण्यासाठी सनफार्मा चौकामधील सिग्नल चालू करण्याची मागणी आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी केली.
आमदार संग्राम जगताप यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली.
आमी संघटनेच्या सर्व प्रश्न जाणून घेतल्यानंतर आमदार जगताप यांनी तात्काळ एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देखील आमदार जगताप यांनी दिल्या आहेत. तसेच एमएसईबी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे सांगितले. एमआयडीसीमध्ये कोणतीही घटना घडल्यास व काही अडीअडचणी निर्माण झाल्यास तात्काळ मला संपर्क करा असा धीर या वेळी आमदार जगताप यांनी उद्योजकांना दिला आहे. या बैठकीसाठी उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, संजय बंदिष्टी, महेश इंदानी, राजेंद्र कटारिया, अरुण कुलकर्णी, प्रवीण बजाज, मिलिंद गंधे, मिलिंद कुलकर्णी, राजीव गुजर, प्रशांत विश्वासे, राजेंद्र शुक्रे, कल्पेश इंदानी, पुरुषोत्तम सोमानी, जुईली मुळे, विजय इंगळे, चिन्मय सूखथनकर, प्रफुल्ल नातू, निनाद टीपूगडे, नितेश लोढा आदी उपस्थित होते.