अहिल्यानगर : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (७ ऑक्टोबर) रात्री १२ च्या सुमारास घोसपुरी (ता. नगर) शिवारात घडली आहे. वर्षा गोरख भोसले (वय २८ रा. घोसपुरी, मुळ रा. सारोळा कासार, ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी तिघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख चलाश्या भोसले, देवकी शशीकांत भोसले, मागाई चलाश भोसले (सर्व मुळ रा. सारोळा कासार, हल्ली रा. घोसपुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
(संग्रहित दृश्य.)
उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
मयत वर्षाचे आई गायत्री फकफक चव्हाण (वय ४० रा. पडेगाव, ता. कोपरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. वर्षाला घरगुती कारणावरून गोरख भोसले, देवकी भोसले, मागाई भोसले यांनी शारिरीक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तिने सोमवारी रात्री १२ च्या सुमारास विषारी औषधाचे सेवन केले. तिला उपचारासाठी तिचा पती गोरखने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.सदर घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलिसांनी सुरूवातीला आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वर्षाच्या आईने नगर तालुका पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गांगर्डे करत आहेत.