अहिल्यानगर एमआयडीसीत गॅस पाईपलाईनचे कामकाज चालू करायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून ठेकेदाराकडे खंडणीची मागणी करणार्या दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीपीसीएल गॅस पाईपलाईनचे ठेकेदार अंकित पारस पिचा वय ३० हल्ली रा. पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली आहे.
(संग्रहित दृश्य.)
कामगारांना मारहाण करून त्यांना पळवून लावेल.
सोमनाथ कराळे रा. नागापूर, अहिल्यानगर व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे ५ ऑक्टोबर रोजी कामानिमित्त एमआयडीसीतील कार्यालयाच्याबाहेर उभे असताना सोमनाथ तेथे आला. तो फिर्यादीला म्हणाला, गॅस पाईपलाईनचे कॉन्ट्रक्टर तुम्हीच आहेत का ? तुम्हाला एमआयडीसीमध्ये गॅस पाईपलाईनचे कामकाज करायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील. तुम्हाला माझ्या परवानगीशिवाय कामकाज चालू करता येणार नाही. तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाले. तुम्हाला पैसे का द्यायचे. त्यानंतर सोमनाथने फिर्यादीला शिवीगाळ करून ‘मी या गावचा दादा आहे, तु मला पैसे दिले नाही तर, मी तुझे कामकाज चालू देणार नाही तसेच तुझ्या कामगारांना मारहाण करून त्यांना पळवून लावेल. असे म्हणून तो तेथून निघून गेला.