लोणी खुर्द येथील लोमेश्वर मंदिर परिसरात प्रभावती घोगरे यांचा अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, प्रभावती घोगरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ॲड.नारायण कारले, सरपंच जनार्दन घोगरे ,राजेंद्र घोगरे , विजय दंडवते ,शीतल लहारे ,सचिन चौगुले ,सुधीर म्हस्के ,सिमोन जगताप, गणपतराव सांगळे, उत्तम आहेर ,लता डांगे, राजेंद्र घोगरे, डॉ एकनाथ गोंदकर, राजेंद्र निर्मळ , चंद्रभान धनवटे, शिवसेनेचे सुहास वहाडणे आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या राज्याचे लक्ष हे संगमनेर आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे. सर्वसामान्य जनतेत आनंद निर्माण करण्यासाठी ही लढाई आहे. धांदरफळ येथील सभेमध्ये वसंत देशमुख वाईट बोलला. तो विखे यांचा पट्टा घालून फिरत असतो. त्याने डॉ.जयश्री थोरात यांचा अपमान केला तेव्हा विखे हे टाळ्या वाजवत होते म्हणून या घटनेला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही वसंत देशमुखला म्हणतात आमचे नेते, तुम्हाला वेळ कमी पडला पुढे वेळ वाढून देतो, ही कोणती प्रवृत्ती आहे .महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या तुमच्या प्रवृत्तीला आमच्या महीलांनी जाब विचारला तर तुम्ही पळून गेला. त्यावेळेस तुम्ही कार्यकर्त्यांना विसरले. तुम्ही मर्द होता तर का लपून पळाले आणि त्या सभेमध्ये स्थानिक कुणीही नव्हते सगळे राहता मतदार संघातील मंडळी होती.
(संग्रहित दृश्य.)
हे कसले टायगर…..
अत्यंत खालच्या पातळीवर टीका झाली .पण जयाताई रडली नाही. संगमनेर तालुका चळवळीचा आहे. संगमनेरच्या नादाला लागू नका. अंभोरे येथील सभेत नाटकी भाषणे सर्वांनी पाहिली आहेत. दहशतीचे आरोप आमच्यावर करतात खरी दहशत कुठे आहे एकदा जनतेच्या न्यायालयात समोरासमोर होऊन जाऊ द्या असे आव्हान देताना तुम्ही विरोधी बोलले म्हणून अनेकांची हातपाय मोडले .संगमनेर तालुक्यातील विरोधक सुद्धा आमचा आदर करतात. खासदार निलेश लंके म्हणाले की, संपूर्ण राज्यामध्ये सुसंस्कृत नेता म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांना ओळखले जाते. प्रवरा परिसरात त्यांची मोठी दहशत आहे. ही दहशत कायमची काढण्यासाठी सर्वांनी प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांची यंत्रणा ही फुटीर आहे. या प्रवृत्तींचे विचार घाणेरडे आहे. हे कसले टायगर. मांजरीने वाघाचे कातडे पांगरले म्हणून टायगर कोणी होत नाही. २३ नोव्हेंबर नंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. तेव्हा प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नका. दडपशाही करू नका अन्यथा उलटी गिनती आम्ही करू शकतो. खासदार शरदचंद्र पवार व आमदार बाळासाहेब थोरात यांचे संस्कार आमच्यावर आहेत म्हणून विनंती करतो की वाईट वागू नका.