By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: बाळासाहेब थोरातांच्या कन्येवर टीका करण्याऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, २४ तासात सुटका.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > बाळासाहेब थोरातांच्या कन्येवर टीका करण्याऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, २४ तासात सुटका.
अहमदनगर

बाळासाहेब थोरातांच्या कन्येवर टीका करण्याऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, २४ तासात सुटका.

Last updated: 2024/10/28 at 7:36 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात  यांच्यावर भाजप नेते सुजय विखे यांच्या सभेत वसंत देशमुखांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला होता. देशमुख यांच्या वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ करत देशमुखांना अटक करण्याची मागणी केली होती. रविवारी पोलिसांनी वसंत देशमुखांना अटक केली. आता आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. 

डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य, वसंत देशमुख पोलीसांच्या ताब्‍यात(संग्रहित दृश्य.)

वसंत देशमुख यांची अटकेपूर्वी तब्येत बिघडल्याने…

धांदरफळ येथील सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. काल पुण्यातुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वसंत देशमुखांना अटक केली होती. वसंत देशमुखांना अटक झाल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले असता संगमनेर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.  याबाबत संगमनेरचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे म्हणाले की, वसंत देशमुख यांची अटकेपूर्वी तब्येत बिघडल्याने आणि त्यांची बायपास झालेले असल्याने संगमनेर येथे प्राथमिक तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात भरती करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांना नाशिकमध्ये नेण्यात आले. आज सकाळी त्यांना संगमनेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने वसंत देशमुखांना जामीन मंजूर केला असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी त्यांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भाजप नेते सुजय विखे यांच्या धांदरफळ येथील एका सभेत वसंत देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सभेत देशमुख यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येवर खालच्या भाषेत टीका केली. भर मंचावर आक्षेपार्ह शब्द वापरल्यानंतर खाली बसलेल्या श्रोत्यांनीही आनंदात टाळ्या वाजवल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीसाठी जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी संगमनेर पोलीस ठाण्याबाहेर तब्बल १२ तास ठिय्या मांडला होता. यानंतर पोलिसांनी वसंत देशमुखांना अटक केली होती. 

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अजित पवारांचा पत्ता कट ? हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री होणार ?
Next Article प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नका, दडपशाही करू नका अन्यथा उलटी गिनती आम्ही करू शकतो. – खासदार लंकेंचा हल्लाबोल.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?