By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: निवडणुकांमध्ये पुढाऱ्यांची जी हुजुरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > निवडणुकांमध्ये पुढाऱ्यांची जी हुजुरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार.
अहमदनगर

निवडणुकांमध्ये पुढाऱ्यांची जी हुजुरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार.

Last updated: 2024/11/01 at 6:39 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

सरकारी नोकरी असलेल्या पगारी व्यक्तींनी आचारसंहितेचा भंग करू नये, अशा स्पष्ट सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या असताना देखील श्रीगोंदा तालुक्यातील दोन शिक्षक निवडणूक कामात लुडबुड करत असल्याने आता त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. त्यामुळे या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. श्रीगोंदा येथील एका शिक्षण संस्थेवर ते काम करत असून सचिन पाचपुते यांनी याबाबत तक्रार केली आहे.

Election Commission : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका कार्यक्रम कसा असणार? | Prahaar.in(संग्रहित दृश्य.)

सरकारी नोकरी असलेल्या व्यक्तींनी आचारसंहितेचा भंग करू नये.

याबाबत अधिक माहिती अशी कि श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीश सर्यवंशी व चिखली येथील माध्यमिक शिक्षक रामदास झेंडे या दोघांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. दोन्ही शिक्षक हे नागवडे यांचे कार्यकर्ते असल्याची तक्रार सचिन पाचपुते यांनी केली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारी नुसार श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश सूर्यवंशी व चिखली येथील माध्यमिक शिक्षक रामदास झेंडे हे सरकारी नोकरी करत असताना सुद्धा अनुराधा राजेंद्र नागवडे यांचा एबी फॉर्म घेण्यासाठी मुंबई येथे प्रत्यक्ष उपस्थित होते. त्याबाबतचा फोटोसह पुरावा तक्रारदार सचिन पाचपुते यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे. डॉ. सतीश सूर्यवंशी व रामदास झेंडे यांना आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी सचिन पाचपुते यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. पाचपुते यांच्या तक्रारीची दखल घेत सहा. निवडणूक अधिकारी यांनी डॉ. सतीश सूर्यवंशी आणि रामदास झेंडे यांच्याकडून खुलासे मागितलेले आहेत. ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थामध्ये  कार्यरत असलेल्या शिक्षकांचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जात आहे. सरकारी नोकरी असलेल्या पगारी व्यक्तींनी आचारसंहितेचा भंग करू नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. दरम्यान आता शिक्षकांविरुद्ध थेट तक्रार करण्यात आल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अनेक लपून छपून प्रचार करणारे आता पुढे काय करायचे असा सवाल उपस्थित करत आहेत.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अहिल्यानगर-पुणे महामार्गावर एका चारचाकी वाहनात २३ कोटी ७१ लाख ९४ हजार रुपयांचे डायमंड, सोने व चांदी आढळले.
Next Article नगर जिल्ह्यात विधानसभेच्या १२ जागांसाठी २८८ इच्छुकांचे ४१५ अर्ज दाखल. ४ तारखेपर्यंत माघार घेण्यास संधी.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?