निष्ठावान शिवसैनिक अपघात करत नाहीत. तुम्ही शिवसेनेचे निष्ठावान म्हणता, दुसरीकडे भाजपाचे टेंडर भरतात. मग तुम्ही कसले निष्ठावान शिवसैनिक ? उध्दव ठाकरे यांना अपमानास्पद पध्दतीने वर्षा बंगल्याबाहेर काढले त्याचा बदला घेण्याची वेळ आलेली असताना तुम्ही बंडखोरी करता. असे सांगत खासदार नीलेश लंके यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संदेश कार्ले यांचे नाव न घेत हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना खासदार निलेश लंके पुढे म्हणाले, शिवसेनेची व्याख्या मला सांगू नका. माझ्या हातात आजही शिवबंधन आहे. स्वाभिमानी मतदार बंडखोरी खपवून घेणार नाही. हे ठरावीक गावांत फिरतात. लोक बुक्क्याच्या गाडीत नव्हे तर गुलालाच्या गाडीत बसतात. आमच्या व्यासपीठावर निष्ठावान लोक असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.
(संग्रहित दृश्य.)
बुडत्या जहाजात बसायला कोणी तयार नाही.
खासदार निलेश लंके पुढे म्हणाले, ही निवडणूक राज्याच्या हिताची आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. आपला उमेदवार विजयी होणार आहे. फक्त मताधिक्क्याचा प्रश्न शिल्लक असल्याचे सांगत ही निवडणूक फार पुढे निघून गेल्याचे खासदार लंके म्हणाले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शशिकांत गाडे हे होते. यावेळी माधवराव लामखडे, प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, संपत म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, घनश्याम म्हस्के, बाळासाहेब कोतकर, संजय जपकर, आबासाहेब कर्डिले, शिवा होळकर, पोपट खामकर, एकनाथ झावरे, साहेबराव बोडखे, अजय लामखडे, विद्या भोर, बाळासाहेब गायकवाड, केतन लामखडे, गंगाधर रोहकले, वसंत पवार, अशोक शिंदे, मंजाबापू निमसे,व्ही.डी. काळे, अशोक धनवटे, शंकर साठे, छबु महांडुळे, तुकाराम कातोरे, भाऊराव गायकवाड, बाळासाहेब पानसंबळ, पप्पू कोल्हे, संजय पाटील, विकास रोहोकले, गौरव नरवडे, विलास होळकर, वसंत ठोकळ, सुरेश ढवळे, अंकुश काळे, राजकुमार आघाव, प्रदीप धुंगार्ड, दिलीप नाट, प्रशांत साठे, भास्कर भोर, बबन भोर, संदिप खेसे, भानुदास लाळगे, धोंडीभाऊ रुपनर, कचरू कांडेकर, सुभाष परभणे, भानुदास भगत, राजू नरवडे, पप्पू ऊरमुडे, राधाकृष्ण वाळुंज, गजानन पुंड, गोरख काळे, भाऊ सोनवणे,दिपक कार्ले, राजेंद्र गावखरे, विलास जपकर, जनार्धन माने, अरुण लांडगे, महेश काळे,, गोकुळ जाधव, पोपट पुंड, नंदा शेंडगे, डॉ.बबनराव डोंगरे, प्रविण कोठुळे आदी उपस्थित होते. बुडत्या जहाजात बसायला कोणी तयार नाही. २४ तास ३६५ दिवस आम्ही झटतो आहोत. म्हणून जनता आमच्या सोबत आहे,प्रेम करते. आज निवडणूका आल्या म्हणून भुछत्रासारखे ते उगवले आहेत. अनेक जण आपल्यासोबत येण्यासाठी फोन करत आहे. काहींनी विरोधी उमेदवाराला घोडयावर बसविले. उमेदवारी मिळवून दिली तेच आता इकडे येण्यासाठी धडपड करत आहेत. कारण बुडत्या जहाजात बसण्यासाठी कोणी तयार नसल्याचे खासदार लंके म्हणाले.
(संग्रहित दृश्य.)
राणी लंके कुठली आहे याची कुंडली तपासा.
म्हशीच्या शिंगात डोकं घालण्यासाठी पैसा मिळत असेल तर डोके घालायला अडचण काय ? हे प्रवरेचे टेंडर आहे. तुम्ही काय शिवसेनेच्या निष्ठा सांगता ? स्वतःला स्थानिक म्हणता मग आम्ही पाकीस्तानी आहोत का ? चार गावांचे तुम्ही टेंडर घेतले काय ? तुमचे नगर तालुक्यात बुथ लागणार नाही. मी डोक्यात घेतले तर ग्रामपंचायत सदस्य होऊ देणार नसल्याचे इशारा खासदार लंके यांनी दिला आहे . त्यांच्या पक्षाचे सर्वेक्षणात सांगितलंय कोण विजयी होणार. स्थानिक मुद्दा काय काढता ? राणी लंके कुठली आहे याची कुंडली तपासा. राणी या तुमच्याच तालुक्यातील आहेत. आपला विजय अटळ आहे. तो कोणीही रोखू शकत नाही. किमान एक लाखांनी उमेदवार विजयी झाला पाहिजे असे काम करा. राज्यात पहिल्या पाच विजयी उमेदवारांमध्ये आपला उमेदवार विजयी होणार असून जे आपल्या विरोधात उमेदवार आहेत त्यांच्याच पक्षाचे हे सर्वेक्षण आहे. सल्ल्यात कुस्ती आहे त्यामुळे जास्त अंगावर घेऊ नका. समोरचे उमेदवार दुसऱ्याच्या झेंडयावर पंढरपूर करणारे हे आहेत. सर्वजण वेगवेगळया हेतूने उभे आहेत. त्यांना समाजाचे देणे घेणे नसल्याचे सांगतानाच लंके यांनी विरोधकांवर शरसंधान केले. टक्केवारी न सांगता विश्वासाने काम करा. नगर तालुक्यातील शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचे काम करावे. नगर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी राणी लंके यांच्या पाठीशी आहेत. सर्वजण एकसंघपणे प्रचार करणार आहेत. सकाळी एक व रात्री एक असे होणार नाही. नगर तालुक्याची लाडकी बहिण म्हणून तालुक्याने एकशिक्की मतदान करावे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही वातावरण आहे. अनेक सर्वेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल असे सांगितले आहे. विरोधकांना ११७ पर्यंत जागा मिळतील. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. येणारे सरकार हे शेतकरी हिताचे येणार आहे. कापूस, सोयाबीन, दूध उत्पादक शेतकर्यांच्या हिताचे असेल. सध्या कापसाला, सोयाबीनला भाव मिळत नाही. दूध उत्पादकांना अनुदान मिळालेले नाही. जिल्ह्यात विकास आघाडीचे वातावरण चांगले आहे.