राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध शड्डू ठोकला असून मुख्यत्वे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरुद्ध ते मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या २ दिवसांत त्यांनी मंत्री छगन भुजबळ व दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात दौरा करुन त्यांनी कशी गद्दारी केली, याचा वाढा वाचला आहे. तर बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचार सभेकरीता राहाता आले असता नाव न घेत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मध्यंतरी नगर जिल्ह्यातील काही लोक मला मुंबईला भेटले. त्यांनी सांगितलं की आमच्या भागात दहशतवाद फार आहे. काही लोक दमदाटी देतात ही दडपशाही कशी बंद होईल? याचा विचार करा, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे. तसेच, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात, अशा शब्दात इशाराही दिला आहे.
(संग्रहित दृश्य.)
मी तुम्हाला शब्द देतो देशातील एक नंबरचे राज्य….
मी राज्यात सत्तेत नाही पण या भागामध्ये दमदाटीचा आधार घेऊन कोणी काय करत असेल तर ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी आहेत. त्यांना धडा शिकवण्याचा सुद्धा निकाल घ्यावा लागेल. ती स्थिती येऊ नये अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी राहता येथील सभेत म्हटले आहे. या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी तुम्ही प्रभावती ताईंना विजयी करा. महाराष्ट्राचे राजकारण बदलण्याचा निकाल आम्ही लोकांनी घेतलेला आहे. त्याला साथ द्या. मी तुम्हाला शब्द देतो देशातील एक नंबरचे राज्य म्हणून जो महाराष्ट्राचा नावलौकिक होता. या लोकांनी जो घालवला. तुम्ही सत्ता दिल्यानंतर व आम्ही राज्य हातात घेतल्यानंतर बाळासाहेब आणि आमचे सगळे सहकारी या भागाचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, असेही शरद पवारांनी म्हटले. मध्यंतरी नगर जिल्ह्यातील काही लोक मला मुंबईला भेटले. त्यांनी सांगितलं की आमच्या भागात दहशतवाद फार आहे. काही लोक दमदाटी देतात, ही दडपशाही कशी बंद होईल? याचा विचार करा. आज लोकशाहीचे राज्य असताना सामान्य माणसावर कोणी दडपशाही करत असेल, दहशतवाद या ठिकाणी करत असेल तर हे कसले राज्य? उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रभावती घोगरे यांना मतदान करा. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता बहुमतांनी स्थापन केल्यानंतर इथला दहशतवाद व दडपशाही उध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशरा शरद पवारांनी दिला आहे. दहशतवादाला आणि दडपशाहीला तुम्ही घाबरू नका. तुमच्यात धमक असली तर निवडणुकीच्या मार्गाने तुमचं म्हणणं मांडा. आमच्या या भगिनींनी स्वतः या ठिकाणी येऊन त्यांचे विचार मांडले. तुम्ही करताय काय? त्यांच्यासमोर येऊन तोंड देण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. मग करताय काय? इथे बोर्ड कुठे लागले असेल, जाहिरात असेल, कुठे फोटो असेल, कुठे माहिती पत्र असेल ते रात्री फाडून टाकायचे. याला काही अक्कल लागते? उभं करायला अक्कल लागते. उध्वस्त करायला अक्कल लागत नाही. ही उध्वस्त करणाऱ्यांची टोळी आहे, त्या टोळीच्या हातामध्ये या भागाचे राजकारण कधी द्यायचं? याचा विचार तुम्हा सर्वांना करायचा आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.