By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: नगर एमआयडीसी परिसरात दोन जुगार अड्ड्यांवर छापे ,२.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त, तर १७ आरोपींना अटक…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > नगर एमआयडीसी परिसरात दोन जुगार अड्ड्यांवर छापे ,२.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त, तर १७ आरोपींना अटक…
अहमदनगर

नगर एमआयडीसी परिसरात दोन जुगार अड्ड्यांवर छापे ,२.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त, तर १७ आरोपींना अटक…

Last updated: 2025/05/13 at 11:31 AM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

अहिल्यानगर : एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जुगार अड्ड्यांवर एकाच दिवशी छापा टाकून एकूण १७ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण दोन लाख २७ हजार ९३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये एका पतसंस्थेचा व्हा. चेअरमन, वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. यामुळे एमआयडीसीत या कारवाईची जोरदार चर्चा रंगली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी रविवारी (दि.११ मे) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहितीच्या आधारे दोन ठिकाणी छापे टाकले. सह्याद्री चौक ते चाकण ऑईल मिल रस्त्यालगत असलेल्या हॉटेल जनता दरबारच्या मागील पटांगणात व वडगाव गुप्ता ते शेंडी जाणार्‍या रस्त्यालगत असलेल्या उघडमळा शेतजमिनीत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. किरण प्रभाकर पानपाटील (रा. भिंगार), अविनाश माणिक भोसले (रा. पाथर्डी), एकनाथ केरू कोतकर (रा. इसळक, ता. अहिल्यानगर), प्रदीप भाऊसाहेब कोहोक (रा. दौलावडगाव, नागापूर), महेंद्र शिवराय कदम (रा. नवनागापूर), रवींद्र रावसाहेब साळवे (रा. माळीवाडा), अनिल चंदू मके (रा. निंबळक, ता. अहिल्यानगर), विशाल भाऊसाहेब पाटोळे (रा. नागापूर), नीलेश भालचंद्र भाकरे (रा. नागापूर), चंद्रकांत बबन आंबेडकर (रा. माळवाडी, वडगाव गुप्ता), राजेंद्र शिवराम कदम (रा. वडगाव गुप्ता), सावता आष्टीम चव्हाण (रा. माळवाडी, वडगाव गुप्ता), भाऊसाहेब रामचंद्र वरूटे (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव गुप्ता), शंकर रामभाऊ धुमाळ (रा. धुमाळ वस्ती, वडगाव गुप्ता), नारायण धोंडीराम शिंदे (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव गुप्ता), भाऊराव लहानु शिंदे (उघड मळा, वडगाव गुप्ता), हुसेन गुलाब सय्यद (रा. वडगाव गुप्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्या जुगार्‍यांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीकडून, गुंतवणूकदारांची जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक…
Next Article बालिकाश्रम रस्त्यावर अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या गोल्डन कॅफेवर तोफखाना पोलिसांचा छापा…
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?