अवैध वाळु वाहतुक करणाऱ्याविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपीकडून ७,२०,००० रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. मा. पोलीस अधिक्षक,अहिल्यानगर यांनी श्री. दिनेश आहेर स्थागुशा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे यांचे पथकास अवैध धंदयाविरुध्द कारवाई करण्यासाठी रवाना केले. दिनांक १३/०५/२०२५ रोजी पथक श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढत असताना गोपनीय माहिती मिळाली की भामाठाणकडून टाकळी भानच्या दिशेने एका विटकरी रंगाचे टेम्पोमधुन एक इसम वाळुची चोरून वाहतुक करत आहेत. मिळालेल्या माहितीवरून पथकातील पोलीस अंमलदार भामाठाण ते टाकळीभान जाणारे रोडवर, शिवशंभो महादेव देवस्थान, टाकळीभान, ता.श्रीरामपूर येथे सापळा रचुन थांबले असताना संशयीत विटकरी रंगाचा टेम्पो दिसून आल्याने त्यास थांबवून पंचासमक्ष टेम्पाची तपासणी केली असता त्यामध्ये वाळु दिसून आली. घटनास्थळावरून टेम्पो चालक सोमनाथ बाळसाहेब मोरे, वय २३ , रा.भामाठाण, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीस टेम्पोचे मालकीबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा टेम्पो स्वत:च्या मालकीचा असल्याचे सांगीतले. आरोपीकडे वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याने त्याचे ताब्यातील ७.००.००० रू किंमतीचा टाटा कंपनीचा विना क्रमांकाचा टेम्पो व २०,००० रू किंमतीची वाळु असा एकुण ७,२०.००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरूध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गुरनं २८५/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३०३ (२ ), प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्हयाचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.