Orange Health Benefits:
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारातली संत्र्यांची विक्री वाढते. दिवसभरात तुम्ही जर प्रवास करत असाल तर तुम्हाला बसस्थानक,लोकल ट्रेन,इतर अनेक ठिकाणी आतापर्यंत संत्र्याच्या पाट्या घेऊन विक्रीसाठी असलेले विक्रेते दिसले असतील, हिवाळ्यातील थंड तापमानात शरीराचे संतुलन राखण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. आहारातील संतुलन राखताना हंगामी फळे व भाज्यांचे सेवन करणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. बाजारात सुद्धा सफरचंद, डाळिंबाच्या जोडीने संत्र्याची संख्या वाढलेली दिसत असेल. अशावेळी हिवाळ्यात दररोज संत्र्याचा आस्वाद घेणे खरोखरच फायद्याचे आहे का किंवा यामुळे नेमका तुमच्या शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो हे आपण तज्ज्ञांच्या मते जाणून घेतले आहे.
१) किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
जर शरीरामध्ये सायट्रेटची कमतरता असेल तर त्यामुळे मूतखड्याचा त्रास होऊ शकतो. मात्र संत्र्यामुळे तुमच्या शरीरातील सायट्रेटचे प्रमाण वाढते. शिवाय संत्र्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. सहाजिकच यामुळे तुमचे किडनी स्टोन अथवा मूतखड्याचा त्रासापासून संरक्षण होते.
२) रोगप्रतिकारशक्ती वाढते.
व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील महत्त्वाच्या क्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकला, नाक आणि कानाचे इनफेक्शन अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश असणं गरजेचं आहे. नियमित संत्री खाण्यामुळे आपले अशा आजारपणापासून संरक्षण होते.
३) रक्तदाब नियंत्रणात राहण्यात मदत होते.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 भरपूर असते. ज्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीला प्रेरणा मिळते. याचा परिणाम आपल्या रक्तदाबावर होतो. कारण त्यातील मॅग्नेशियममुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो.
४) कोलेस्ट्रॉल कमी होते
एका संशोधनानुसार लिंबूवर्गीय फळांमधील पोषक घटकांमुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे जर आपल्याला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर ते कमी करण्यासाठी आपण आहारात व्हिटमिन सी युक्त संत्र्याचा वापर नक्कीच करू शकतो.
५) मधुमेहींसाठी वरदान (A Boon For Diabetics)
मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी गोड फळं खाणं वर्ज्य असतं. मात्र मधुमेही संत्री नक्कीच खाऊ शकतात. एकतर यामधील साखरेचे प्रमाण फारच कमी आहे. शिवाय त्यातील फायबर्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास आपल्याला मदत होते. त्यामुळे मधुमेहींसाठी जेवण्याच्या मधल्यावेळी संत्री खाणं हा एक चांगला पर्याय आहे.
६) कर्करोगाचा धोका कमी होतो.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग अशा अनेक कर्करोगापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. संत्र्यामुळे वाढणारी रोगप्रतिकार शक्ती अशा कर्करोगाच्या पेशींना शरीरात वाढू देत नाही. यासाठी नियमित आहारात संत्र्याचा वापर केले पाहिजे.
७) शरीराला व्हिटॅमिन सी मिळते.
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. एक संत्रे दररोज खाण्यामुळे आपल्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन सी मिळू शकतं. शरीरात व्हिटॅमिन सीचं प्रमाण पुरेसं असेल तर आपले कर्करोगापासून संरक्षण होऊ शकते. कारण त्यामुळे आपल्या शरीराचे वातावरणातील फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते.
८) वजन नियंत्रणात राहते.
वजन नियंत्रणात राहण्यासाठी कमी कॅलरिज आणि फायबरयुक्त आहाराची गरज असते. संत्र्यामध्ये फायबर्सचे प्रमाण नक्कीच जा्स्त आहे. शिवाय त्यामुळे आपल्या शरीराला कॅलरिजदेखील कमी मिळतात. म्हणूनच वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज संत्री खाणे आवश्यक आहे.
९) त्वचेचं नुकसान टाळता येतं
संत्र्यामध्ये अँटीऑक्सिंडट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे जर आपल्या आहारात संत्र्यांचा समावेश असेल तर आपल्या त्वचेचे फ्री रेडिकल्सपासून होणारे नुकसान कमी होते. जर आपल्याला कायम तरूण आणि उत्साही दिसायचं असेल तर संत्री खाणं आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. संत्री खाण्याचे फायदे केवळ शरीरावरच नाही तर सौंदर्यावरही परिणामकारक ठरतात.
१०) डोळ्यांचे आरोग्य सुधारते
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए सुद्धा असते. जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. ज्यांच्या शरीरात व्हिटमिन एची कमतरता असते त्यांना अंधत्व अथवा दृष्टीदोष सहन करावे लागतात. मात्र संत्री खाणं अशा रितीनेदेखील आपल्या फायद्याचं ठरू शकतं.