उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्री रामजन्मभूमी मंदिराचा भव्य अभिषेक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. पीएम मोदी ३० डिसेंबरला अयोध्येला भेट देणार असून अयोध्या रेल्वे स्टेशन आणि नवीन विमानतळाचे उद्घाटनही करणार आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक राजकारणी आणि अभिनेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.प्रभू श्रीरामांना मानणारे भक्त राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
जातीयवादाच्या दुनियेत प्रभू श्रीरामांची शबनम भक्त.
सध्या जातीयवादाचे राजकारण देशभरात सुरु आहेच.कोणत्याही घटनेचे जातीयवादामध्ये रुपांतर करून तणाव निर्माण करून आपली पोळी भाजणाऱ्यांना चागलाच चोप शबनमने दिला आहे. प्रभू श्रीरामांना मानणारे अनेक भक्त हिंदू समाजात आपण पाहतो.पण प्रभू श्रीरामांचे मुस्लीम भक्त देखील आहेत हे आज शबनमच्या यात्रेवरून पाहायला मिळाले आहे. मुंबईची राहणारी शबनम २१ डिसेंबर रोजी मुंबईतून अयोध्येला पायी निघाली आहे. प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी निघालेल्या शबनमला १४०० किमीहून जास्त अंतर गाठावे लागणार आहे. शबनम ही मुस्लिम आहे. मात्र तिचं म्हणणं असं आहे राम तर सगळ्यांचा आहे. त्यासाठी हिंदू असणं आवश्यक नाही. एक चांगला माणूस असणं गरजेचं आहे.शबनम आणि तिचे दोन सहकारी रोज तीस किलोमीटर अंतर चालत आहेत. भगवान रामाच्या भक्तीत हे सगळे इतके लीन झाले आहेत की त्यांनी अयोध्येला पोहचण्यासाठी कुठलीही तारीख निश्चित केलेली नाही. होइही सोइ जो राम रचि राखा! या सूत्राने ते पुढे चालत आहेत.
शबनमला पोलीस संरक्षण.
२१ डिसेंबरला शबनम मुंबईहून निघाली आहे
एका दिवसात २५ ते ३० किमी अंतर ते चालतात
शबनमसह तिचे दोन सहकारी रमन आणि विनीत आहेत.
शबनम मुलगी असल्याने तिला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे
या तिघांच्याही खाण्या-पिण्याची आणि राहण्याची व्यवस्था पोलीस करत आहेत.