TIMES OF AHMEDNAGAR
काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस उबेद शेख यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मोठी जबाबदारी.

जनसेवक उबेद शेख.
अनेक सामाजिक उपक्रमांमधून नगरकरांच्या सेवेत असणारे उबेद शेख अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे,अडीअडचणीत असणाऱ्या लोकांच्या पाठीशी उबेद शेख सतत उभे असतात. समाजासाठी आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा अनेक सामाजिक विषयांची जनजागृती कार्यक्रम उबेद शेख यांनी केले आहेत. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले उबेद यांच्या सामाजिक कामाची दाखल घेत त्यांना काँग्रेस पक्षात जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पद देऊन अहमदनगर शहराची जबाबदारी सोपविण्यात आली.
आमदार जगतापांचे विश्वासू.
आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक उबेद शेख यांनी मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवास्थानी महाराष्ट्रातील जिल्हाअध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, यांना नियीक्तीचे पत्र अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक उबेद शेख यांच्यावर जिल्हाउपाध्यक्ष पदाची जबाबदारीचे पत्र अजित पवार यांच्या हस्ते शेख यांना देण्यात आले. मागील ३२ ते ३५ वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून विविध पदे भूषवित राजकीय सामाजिक कार्य उबेद शेख यांनी केले.
रामलीला मैदानात गाजले उबेद शेख.
एक तरुण व्यक्तिमत्व म्हणून उबेद शेख यांची त्या काळी ओळख होती. आपल्या आवाजाच्या ठोक्याने नगरकरांच्या आवाजाला शासनापर्यंत पोहचवणारे उबेद शेख त्याकाळी अत्यंत बेधडक भूमिका मांडायचे.त्यांच्या कामाची दाखल घेत दिल्ली येथील रामलीला मैदानात त्यांना राष्ट्रीय अधिवेशनात बोलण्याची संधी मिळली होती. अनेक सामाजिक कामात अग्रेसर राहून आंदोलने उभारीत आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ने दिलेल्या संधीचा चांगला उपयोग करून पुन्हा आपण जनतेच्या सेवेत असल्याचे उबेद शेख यांनी सांगितले. अजित पवार, सुनील तटकरे,संग्राम जगताप,जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या विश्वासास पात्र ठरवून दाखवू व सामाजिक कार्यातून पक्षसंगठना उभी करू असा विश्वास उबेद शेख यांनी केला.



