TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर शहरातली भाईगिरीला आळा घालण्यासाठी पोलीसगीरी कमी पडत आहे.गुन्हेगारांच्या गुन्ह्याला आवर घालण्यासाठी पोलिसांच्या एकही उपाययोजना सध्या दिसत नाही. कारण अनेक गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याचे समजते.मंगळवार २ जानेवारी रोजी नागरदेवळे येथे एका सर्वसाधारण मजुराच्या घरावर भ्याड हल्ला झाला. त्या भ्याड हल्यात हल्लेखोरांनी लाकडी दांडके,रॉड,लोखंडी पाइपांचा वापर केला.हल्लेखोरांनी गवंडी असलेल्या त्या कुटुंबातील २ मुलांना बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्या कुटुंबातील दोन्ही मुले गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे हलविण्यात आले होते. मात्र गंभीर स्वरुपाची मारहाण झालेली असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या हल्ल्यातील एका जखमी मुलाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.
हल्ल्याचा सूत्रधार कोण ?
नागरदेवळे येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात उजेर लियाकत शेख व उमेर लियाकत शेख हे बांधकाम मजूर गंभीर जखमी झाले आहेत. शेख यांच्या घरी महिलांना शिवीगाळ करत काही कुख्यात गुंड घुसले होते.या गुंडांच्या हल्ल्यात उमेर लियाकत शेख व उजेर लियाकत शेख हे जखमी झाले होते. फिर्यादीच्या तक्रारीनुसार भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात अभिजित धाडगे, पुष्कर शेलार, उदय शेलार, व इतर ७ ते ८ अनोळखी विरुद्ध भा.द.वी. ३०७, ३२४, ४५२, ३२३, ५०४,५०६, १४३, १४७, १४८, १४९, ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या हल्ल्यात व्यंकटेश नावाचा मुलगा देखील सहभागी असल्याचे समजते. व्यंकटेश हा या गुंडांना घेऊन शेख कुटुंबाच्या घरात घुसला होता. शेख कुटुंबातील सदस्यांवर हल्ला करत असतांना त्याचे वडील देखील तिथे उपस्थित होते. त्याचे वडील व्यंकटेशला मारामारी करण्यापासून रोखत होते त्यावेळी वडिलांना हिस्क्या देत व्यंकटेश त्याच्या वडिलांना ढकलून पप्पा तुम्ही सरका मी याचा व्हिकेट टाकतो असे म्हणत होता.
घटनास्थळी CCTV फुटेज गायब होणार ?
व्यंकटेश हे सरपंच राम पानमाळकर यांचे चिरंजीव आहेत. राम पानमाळकर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत.राम यांच्या राज्यात गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असून अनेक तरुणांना राम हे दारूच्या पार्ट्या देऊन बेकायदेशीर कामांना लावत असल्याच्या खासगी चर्चांना सध्या नागरदेवळे येथे उधान आले आहे.. राम यांचा मुलगा आरोपी असल्यामुळे घटनास्थळाचे महत्वाचे CCTV फुटेज गहाळ होण्याचे संकेत आहेत. राम यांना साम-दाम,दंड-भेद करून खुर्ची वाचवायची आहे. त्यासाठी जातीयवादी दंगे,दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम राम करत आहेत.हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी ताबडतोब गुन्हा नोंदवला आहे.मात्र अद्यापही आरोपी फरार आहेत. मोठ्या नेत्यांच्या मुलाचे नाव आल्याने पोलीस किती लवकर योग्य कारवाई करतात हे बघणे गरजेचे आहे.
पानमाळकरांची गोरगरीब जनतेवर दहशत ?
सरपंच राम पानमाळकर हे घटनास्थळी उपस्थित असल्याचे समजते.पानमाळकर जर या कटाचे सूत्रधार असतील तरपानमाळकरांनी हे कृत्य का घडवले हे जाणून घेणे पोलिसांना कठीण जाईल असे स्थानिक खासगीत सांगतात.निवडणुकांचे वातावरण असल्याने पानमाळकर जातीयवाद घडवण्यास प्रोत्साहन डेत असल्याचे समजते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.