TIMES OF AHMEDNAGAR
प्रसिद्ध शायर आणि कवी मुनव्वर राणा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ९ जानेवारीला त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मुन्नवर राणा यांना किडनी आणि हृदयासंबंधीचे विकार होते. प्रसिद्ध शायर आणि कवी मुन्नवर राणा यांचं लखनऊ या ठिकाणी निधन झाले आहे.
मुनव्वर राणा यांची मुलगी सुमैया यांनी सांगितले की रविवारी रात्री उशिरा वडील मुनव्वर राणा यांचं निधन झालं. आज (सोमवार) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुनव्वर राणा यांच्या मुलाने सांगितलं की आजारी झाल्याने मुनव्वर राणा यांना १४ ते १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आधी मेदांता रुग्णालयात आणि त्यानंतर त्यांना एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मुनव्वर राणा यांच्यानंतर त्यांची पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असं कुटुंब आहे.
मी उत्तर प्रदेशात राहणार नाही …..
२०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होण्याआधी मुनव्वर राणा म्हणाले होते की योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेशात राहणार नाही. या सरकारच्या मनात आलं तर मुस्लिमांना राज्य सोडायला लावतील असंही मुन्नवर राणा म्हणाले होते. २०२० मध्ये एका व्यंगचित्रावरुन वाद झाला आणि फ्रान्समध्ये एका शिक्षकाची हत्या झाली. ही कृती योग्य असल्याचंही राणा म्हणाले होते.
मुनव्वर राणांची लोकप्रिय शायरी
सरफिरे लोग हमें दुश्मन-ए-जाँ कहते हैं,हम जो इस मुल्क की मिट्टी को भी माँ कहते हैं !
किसी को घर मिला हिस्से में, किसी के हिस्से में दुकान आई, मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से में मां आई…
हमसे मोहबत करने वाले रोते ही रह जाएंगे हम जो किसी दिन सोए ,तो सोते ही रह जाएंगे
इस तरह मेरे गुनाहों को वो धो देती है मां बहुत गुस्से में होती है तो रो देती है
जिस्म पर मिट्टी मलेंगे पाक हो जायेंगे हम एै ज़मीं एक दिन तेरी ख़ूराक हो जायेंगे हम
अभी ज़िंदा है माँ मेरी मुझे कुछ भी नहीं होगा, मैं घर से जब निकलता हूँ दुआ भी साथ चलती है!
हम नहीं थे तो क्या कमी थी यहाँ ,हम न होंगे तो क्या कमी होगी