TIMES OF AHMEDNAGAR
पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस महानिरीक्षक बी. जी.शेखर यांनी काढले आहेत. त्यामुळे दहा अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.त्यामुळे आता जिल्ह्यात नऊ पोलीस निरीक्षकांच्या नशीबी अहमदनगर जिल्ह्याचा कारभार आला आहे. मागील काही महिन्यांपासून अहमदनगर जिल्हा व शहर वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत होत. काल सोमवार दी.(१५) एका तरुणाचा शुल्लक कारणावरून खून झाला होता.
आता नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना आपआपल्या हद्दीत नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असणार आहे.पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात नऊ पोलिस निरीक्षक जिल्ह्यात नव्याने दाखल होणार आहेत. जिल्ह्यात तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण केलेले स्वत:च्या जिल्ह्यात नेमणुकीस असलेले व फौजदारी दाखल असलेल्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याचे निकष लावण्यात आले होते. बदल्यांसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार झाल्यानंतर पोलिस महानिरीक्षक यांच्याकडून अधिकाऱ्यांना तीन पसंतीक्रम मागविण्यात आले होते.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी नाशिक परीक्षेत्रातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. ज्या पोलीस निरीक्षकांची सेवा तीन वर्षांपेक्षा जास्त झाली आहे अशा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. याअंतर्गत आता इतर जिल्ह्यातून काही अधिकारी नगरमध्ये येणार आहेत.
कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्या च्या निरीक्षकांसह दहा जणांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. तीन पोलिस निरीक्षकांना जिल्ह्यातच अकार्यकारी पदावर नियुक्त केले असून जिल्ह्यात नऊ नवीन पोलिस निरीक्षक नव्याने जिल्ह्यात आले आहेत.