TIMES OF AHMEDNAGAR
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. भक्तांची दर्शनासाठी एकच धावपळ होती. अनेक वर्षांची प्रतीक्षा सत्यतेत उतरत असल्याने अनेकांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र काही बहादुरांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कलंक लागेल असे कृत्य केले आहे. भक्तांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.
कशी केली फसवणूक ?
काही दिवसांपासून राम मंदिरात दर्शनासाठी व्हीआयपी पास मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. त्यात लोकांना सोशल मिडीयावर बनावट वेबसाइटची लिंक पाठवून ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगितले जात आहे. या पोस्टचा दाखला देत, सायबर क्राइमने नागरिकांना संशयास्पद लिंकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
सरकारची “हेराफेरी” .
राम मंदिराच्या व्हीआयपी दर्शनाच्या नावावर भक्तांना वेड्यात काढून भक्तांचा खिसा मोकळा करणाऱ्या लोकांना सरकारने चपराक लावला आहे. भक्तांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने सायबर दोस्त या एक्स x ( जुने ट्विटर ) या सोशल मिडियावर काही मिम्स देखील टाकले आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
सुनील शेट्टी,अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या सुप्रसिद्ध हेराफेरी या चित्रपटातील डायलॉगचा वापर करून सरकारने एक मजेशीर मीम शेअर केले आहे. त्यातून त्यांनी भाविकांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या लोकांच्या जाळ्यात न फसण्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या सायबर दोस्त नावाच्या एक्स x ( जुने ट्विटर ) या सोशल मिडिया अकाउंटवरून शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जर व्हॉट्सअॅपवर राम मंदिरातील व्हीआयपी एंट्रीबाबत कोणतीही लिंक आली, तर त्यावर अजिबात क्लिक करू नका, अन्यथा तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबर किंवा वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करू नका.