जमावाने हल्ला केल्यानंतर सर्वप्रथम शासकीय अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला. त्यापाठोपाठ पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्यांना तिथून बाहेर काढलं. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. तसेच जमाव नियंत्रणात येत नाही हे लक्षात आल्यावर अधिक पोलीस कुमक मागवण्यात आली. आतापर्यंत या दंगलीत पिता-पुत्रासह सहा जणांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी पत्रकार आणि सामान्य नागरिक जखमी झाले आहेत.
पोलीस ठाणं पेटवलं
पोलिसांनी बनभुलपुरा भागात संचारबंदी लागू केली आहे. या भागात अधिक पोलीस कुमक बोलावण्यात आली आहे. तरीदेखील काही ठिकाणी हिंसाचार चालू आहे. दरम्यान दगडफेकीच्या घटनेत शहर दंडाधिकारी ऋचा सिंह रामनगरच्या कोतवालांसह २५० हून अधिक पोलीस शासकीय अधिकारी आणि पत्रकार जखमी झाले आहेत. समाजकंटकांनी बनभुलपुरा पोलीस ठाण्याला आग लावली आहे. दंगलखोरांनी पोलिसांची वाहनं, जेसीबी आणि अग्निशमन दलाची वाहनंदेखील पेटवली आहेत. आतापर्यंत या दंगलीत ६० हून अधिक वाहनं जाळली गेली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या लाठीचार्ज केला हवेत गोळीबार केला तरीदेखील ही दंगल थांबलेली नाही.
स्त्रोत.सोशल मिडिया.
जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याचवेळी शेकडो लोकांनी घरांच्या छतावरून पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना ही दंगल नियंत्रणात आणता आली नाही. पोलीस वसतीमध्ये येऊ नयेत यासाठी प्रत्येक गल्लीच्या तोंडावर जमावाने टायर्स जाळले. तसेच काही पेटते टायर्स पोलिसांच्या दिशेने भिरकावले. तसेच जमवाने बनभुलपुरा पोलीस ठाणंदेखील पेटवलं आहे.