TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर – रविवारचा दिवस हा सुट्टीचा दिवस असतो. आठवडा भर काम करून सर्वसमान्य व्यक्ती हा रविवारचा दिवस कुटुंबासोबत आनंदाने साजरा करण्याच्या नियोजनात असतो. दिवसभर कुटुंबासोबत रविवारच्या सुट्टीचा आनंद घेऊन नागरिक घरी परतत असतात. मात्र अनावधानाने काहीही होऊ शकते असाच एक प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे. आणि दोन चालकांमध्ये होणारा वाद आमदार जगतापांमुळे मिटला.


आमदार संग्राम जगतापांची मध्यस्थी.
नगर-मनमाड हा वाहता रस्ता आहे. रविवारच्या दिवशी या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड गर्दी असते. नगर-मनमाड रोडवर एक रिक्षाचालक एका चारचाकी वाहनाला धडकला. या धडकेमध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानाने दोन्ही चालक हे रस्त्यावर येऊन वाद करत होते. वाहन चालकांच्या रस्त्याच्या मध्यभागी होणाऱ्या बाचाबाचीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी आमदार संग्राम जगताप हे दैनंदिन कामकाज आवरून नगर-मनमाड रोड वरून जात असताना जमलेली गर्दी व वाहतुकीची कोंडी पाहून आमदार जगतापांनी आपले वाहन थांबवून दोन्ही चालकांची विचारपूस केली. दोन्ही चालकांची समजूत काढून दोन्ही चालकांना वाहन रस्त्याच्या बाजूला घेण्याचे सांगितले आणि झालेली वाहतूक कोंडी आमदार जगतापांनी सुरळीत केली.



