संगमनेर मधील मालपाणी विधी महाविद्यालया जवळील विहिरीमध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. रुपाली धनंजय सातपुते असे या महिलेचे नाव आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
महाविध्यालयाजवळ विहिरीत आढळला मृतदेह.
रुपाली सातपुते या महिलेचा मृतदेह संगमनेर येथील मालपाणी विधी महाविद्यालयाजवळ एका विहिरीमध्ये आढळला. याबाबत नागरिकांनी शहर पोलिसांना तातडीने माहिती दिली . घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब घोडे, पोलीस कर्मचारी शरद पवार हे घटनास्थळी दाखल झाले होते.
स्त्रोत.सोशल मिडिया
महिलेचा मृतदेह.
स्थानिक युवकांच्या मदतीने विहिरीमध्ये बाज टाकून या महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पंचनामा केल्यानंतर या महिलेचा मृतदेह संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. त्यावेळी महिलेची हत्या झाली कि आत्महत्या याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. या महिलेने या विहिरीमध्ये आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या महिलेचा मृत्यू कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत