बलात्कारातील आरोपी सनी जाधवला अटक करण्यास पुणे पोलीस असक्षम ? कोण करणार पिडीतेचे रक्षण ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | PUNE POLICE COMMISSIONER | KOREGAON POLICE STATION | A CASE OF RAPE HAS BEEN REGISTERED AGAINST SUNNY JADHAV | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – अहमदनगर शहरातील व्यापारी सनी जाधव याच्यावर एका महिलेचा बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनीचे शहरात रुबाब उद्योग समूह नावाचे कपड्याचे छोटे दालन आहे. सोशल मिडीयावर युवकांना आकर्षित करून त्याने महाराष्ट्रभर शाखा दिल्या तगडी रक्कम घेऊन हा या तरुणानांना शाखा देत होता. अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक सनी जाधवने केली असल्याची सध्या शहरात चर्चा आहे.
स्त्रोत.सोशल मिडीया.
महिलेला ब्लॅकमेलिंग करत अत्याचार.
सनी जाधव याने पुण्यातील एका महिलेशी जवळीक साधली तिच्याशी व्यावहारिक संबंध प्रस्थापित केले आणि काही दिवसांनी त्या महिलेचा विश्वास संपादन करून त्याने थेट तिला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. त्याने तिला कोरेगाव येथील एका हॉटेलवर नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. सदर महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची देखील धमकी सनीने दिली असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून सनी जाधव याच्यावर भा.द.वी ३७६ (२)(N) , ३२३,५०६ प्रमाणे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(संग्रहित.स्त्रोत.सोशल मिडिया.)
पोलिसांच्या आशीर्वादाने बलात्कारातील आरोपी मोकळा आणि बिनधास्त ?
एका महिलेचा विश्वास संपादन करून एक युवक एका तरुणीचा बलात्कार करतो.पिडीत तरुणी त्याची रीतसर तक्रार देखील दाखल करते. मात्र पोलिसांनी अद्यापही आरोपीला अटक केलेली नाही.बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी असा मोकळा आणि बिनधास्त फिरत असल्याने पिडीत महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो. सोशल मीडियाची स्टार असलेल्या महिलेला जर न्याय मिळत नसले तर सर्वसाधारण महिलांचे काय होणार ? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. जाधव हा बचावासाठी हॉटेल्सच्या खोल्यांमध्ये लपून बसला असल्याची माहिती खबऱ्यांकडून प्राप्त होत असून देखील पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी का टाळाटाळ करत आहेत ?
(संग्रहित.स्त्रोत सोशल मिडीया.)
पिडीत महिलेची खंत,आरोपी अटक करण्याची भूमिका शांत !
सामाजिक कार्यात अग्रेसर असून महिलांच्या सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या एका सर्वसाधारण महिलेच्या जीवनात एक भयंकर प्रसंग येऊन त्या महिलेचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होईल असे कदाचित त्या महिलेने विचार देखील केला नसावा. सनी जाधव या व्यक्तीने तिच्या विश्वासाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला तिने कायद्याची मदत मागितली आणि पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. मात्र आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. प्रश्न असा उद्भवतो कि पोलिसांना आरोपीची माहिती नाही का ? कि पोलिसांना सगळ माहिती असून देखील पोलीस त्यावर गांभीर्याने दाखल घेत नाहीत ? पुणे सारख्या महत्वाच्या ठिकाणी एका महिलेवर अत्याचार होतो आणि पोलीस आरोपीला शोधू शकत नाही हे पुणे पोलिसांचे अपयश आहेच. मात्र आरोपी या प्रकरणातून बचाव करण्यासाठी अटकपूर्व जमीन घेण्यासाठी धावपळ करत असल्याचे देखील पोलीस सूत्रांकडून कळते. मग पोलीसांनाच आरोपीला अटक करायची नाहीये का हा देखील महत्वाचा प्रश्न निर्माण होत आहे.