TIMES OF AHMEDNAGAR
राहुरी येथील आढाव वकील पती-पत्नीच्या हत्येमध्ये अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचा हात असल्याची बातमी काही युट्युब चॅनेल वरून प्रसारित करण्यात आली होती. व्हायरल झालेल्या त्या व्हीडीओ जेष्ठ वकील निखील वागळे यांनी आमदार जगतपांवर थेट आरोप करत अजित पवारांच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची माहिती.
मात्र याबाबत आता थेट राहुरी पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. राहुरी येथील आढाव वकील पती-पत्नीच्या हत्येमध्ये आमदार संग्राम जगताप यांचा काहीही संबंध नाही. या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी अटक झाले असून खून हा खंडणीच्या कारणातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व सराईत गुन्हेगार आहेत अशी माहिती राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले कि यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा विकृत प्रवृत्तीचा असून केवळ खंडणीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. टोळीतील आरोपी सागर खांदे, शुभम महाडिक,हर्षल ढोकणे,बबन मोरे हे सर्व राहुरी तालुक्यातील असून आ. संग्राम जगताप यांच्याशी त्यांचा कुठलाही संबंध तपासात आढळून आलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
आमदार जगतपांवर आरोप काय ?
एका युट्युब चॅनलच्या माध्यमातून पत्रकार निखिल वागळे यांनी थेट अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचा अन् ही टोळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंध आहे.वागळे यांनी या खुनामध्ये आमदार जगताप यांचा हात असल्याचा आरोप केल्याने अहमदनगर शहराच्या राजकारणात धुमाकूळ उडाला होता. मात्र आमदार संग्राम जगताप यांचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याने जगतापांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. या घटनेचे पडसाद शहरात उमटताच काही वेळातच तोफखाना पोलीस ठाण्यात निखिल वागळे तसेच शिवसेना केडगाव फेसबुक चालवणारे सुनील सातपुते यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.