अहमदनगर : नृत्यांगाना गौतमी पाटीलला अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने गौतमीला जामीन मंजूर केला आहे. विनापरवाना कार्यक्रम करुन नियमांचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता न्यायालयाने अटी आणि शर्थींसह गौतमीला जामीन मंजूर केला आहे.

Gautami Patil Lavani Show in Pune Postponed Due to Heavy Rain; पुण्यात गौतमी  पाटीलच्या कार्यक्रमापूर्वी तुफान राडा, पण पावसाचा... कार्यक्रम करावा लागला  स्थगित | Maharashtra ...(सौजन्य.सोशल मिडिया. गौतमी पाटील.)

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मागच्या वर्षी गौतमी पाटीलचा पाईपलाईन रोडवर कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमासाठी तिने संमती घेतली नव्हती. या प्रकरणावरुन गौतमी पाटीलवर पोलिसांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता गौतमी पाटीलला जामीन मंजूर झाला आहे. मागील वर्षी गणपती उत्सवा दरम्यान रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम करण्यात आला होता. यानंतर गौतमी पाटील,तिचे मॅनेजर आणि गणपती मंडळाचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Gautami Patil : गौतमी पाटीलचा 'हा' किलर लूक पाहिला का? पाहा PHOTO(सौजन्य.सोशल मिडिया. गौतमी पाटील.)

रस्त्यात अडथळा निर्माण होईल असा कार्यक्रम घेतल्यामुळे गुन्हा दाखल.

अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर गुरूवारी सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटील, तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात रस्त्यात अडथळा निर्माण होईल असा कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवी कलम १८८,२८३,३४१, ३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम २,१५ आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० चे कलम ३,४,५, ६ आणि मु.पो.का.क ३७ (१) (२)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गौतमी पाटीलला जामीन मंजूर झाला आहे.

कायदा स्वतः च्या हातात घेणे चुकीचेच"; न्यायालयाकडून चौघांना जामीन मंजूर -  Marathi News | Taking the law into one's own hands is wrong; Court granted  bail to four | Latest mumbai News(संग्रहित दृश्य.)

अटी शर्थींसह जामीन मंजूर !

गौतमी पाटील अहमदनगर येथील न्यायालयात हजर झाली होती. त्यानंतर तिला अटी शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतरही गौतमीचा कार्यक्रम झाल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.