पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा भीषण अपघात,अनेकजण गंभीर जखमी तर काही मृत्यू…..
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | WEST BENGAL | THERE HAS BEEN A MAJOR RAILWAY ACCIDENT AS A GOODS TRAIN HAS HIT THE KANCHENJUNGA EXPRESS | FIVE PEOPLE DIED AND 25 WERE INJURED IN THE ACCIDENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे ही घटना घडली आहे. दरम्यान, मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही मालगाडी अगरतलावरून सियालदाह येथे जात होती. यावेळी या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली आहे. ही धडकी इतकी जोरदार होती, की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसलाचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले होते.
स्त्रोत सोशल मिडिया
अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू….
या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिषेक रॉय यांनी दिली आहे. तसेच या ठिकाणी रेक्यू टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले आहेत. याबरोबरच या ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.