नगरमधील एका अल्पवयीन मुलीला दोन महिलांनी भर रस्त्यात लुटले…..
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | SAVEDI | CRIME NEWS | A MINOR GIRL WAS ROBBED BY TWO VEILED MEN | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर – एका अल्पवयीन मुलीला दोन बुरखा घातलेल्या व्यक्तींनी भररस्त्यात सकाळी लुटल्याची घटना सावेडी उपनगरातील परिसरात घडली आहे. यासंदर्भात सतरा वर्षांच्या मुलीने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुलगी खासगी शिकवणी वर्ग सुटल्यानंतर मैत्रिणीला भेटण्यासाठी जाताना तोंडाला काळी मुखपट्टी लावून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी तिला रस्त्यात अडवून लुटले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
पैशांची मागणी केली….
या मुलीकडील मोबाईल व कानातील दोन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंग बळजबरीने काढून घेतल्या आहेत. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सावेडी गावठाणातील पंपिंग स्टेशन रस्त्यावर कराळे हेल्थ क्लबजवळील ओढ्याजवळ ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी सारसनगरच्या चिपाडे मळ्यात राहते. पंपिंग स्टेशन रस्त्यावरील ओढ्याजवळ मागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने तिच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावली होती. पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने मुलीकडे पैशाची मागणी केली. तिने पैसे नसल्याचे सांगताच त्या दोघांनी मोबाईल व कानातील दोन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा जबरदस्तीने काढून घेतल्या आहेत.