नगरमध्ये एक खळबळजनक असा प्रकार घडलेला असून बदनामी करत असल्याच्या आरोपावरून एका युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आलेले आहे. मुकुंदनगर भागातील इकरा हायस्कूल जवळ हा प्रकार घडला आहे. उपलब्ध माहितीनुसार शब्बीर सल्लाउद्दीन शेख ( वय २० वर्ष राहणार दरबार चौक मुकुंदनगर ) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कासिफ असिफ शेख , सलमान पिंजारी यांच्यासोबत एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून शब्बीर याला संशयित आरोपींनी आमची बदनामी का करतो? असे म्हणत मारहाण केली त्यानंतर आरोपींनी शब्बीरच्या पोटाच्या उजव्या बाजूला चाकू खुपसला त्यामुळे त्याला गंभीर जखम झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.