लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने जातीजनगणेची मागणी करत आहेत. यावरून भाजपाकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. अशी मागणी करणं म्हणजे जातीजातींमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपाकडून वारंवार केला जात आहे. अशातच आता कर्नाटकमधील भाजपाच्या आमदाराने राहुल गांधींबाबत एक विधान केलं आहे. जात जणगनणेची मागणी करणाऱ्या राहुल गांधींना ते मुस्लीम आहे की ख्रिश्चन हेच माहिती नाही असं वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकच्या बीजापूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बसंगौडा पाटील यतनाल यांनी राहुल गांधींच्या जातीबाबत विधान केलं आहे. तसेच राहुउल गांधी यांची वंशावळ तपासावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राहुल गांधी अमेरिकेत जातात आणि देशविरोधी विधानं करतात. तर भारतात असताना ते जातीजनगणनेची मागणी करतात. त्यांचा जन्म कोणत्या जातीत झाला, हे कुणालाही माहिती नाही. आपण मुस्लीम आहेत की ख्रिश्चन, हे स्वत: राहुल गांधी यांनाही माहिती नसेल, त्यामुळे राहुल गांधी यांची वंशावळ तपासावी असं ते म्हणाले आहे.

Basanagouda Patil Yatnal | Zee News Kannada(संग्रहित दृश्य.)

ब्राह्मण असल्याचे सांगतात पण ते कोणते ब्राह्मण आहेत ?

पुढे बोलताना ते म्हणाले कि राहुल गांधी हे आपण ब्राह्मण असल्याचे सांगतात पण ते कोणते ब्राह्मण आहेत ? आणि ते ब्राह्मण असतील तर ते जानवं घालतात का ? हे आधी त्यांनी सांगावं असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच राहुल गांधी हे देशी कट्ट्यासारखे आहेत. ते कधीच यशस्वी होऊ शकत नाही अशी खोचक टीकाही आमदार बसंगौडा पाटील यतनाल यांनी यावेळी केली.

Thakur slams Rahul in LS; Rahul replies abuses won't stop fight for caste census(संग्रहित दृश्य.)

मी कोणाचंही नाव घेतलं नाही…

महत्त्वाचे म्हणजे जुलै महिन्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही राहुल गांधींच्या जातीबाबत एक विधान केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काही लोक केवळ ओबीसींबद्दल बोलत असतात. मात्र यांच्यासाठी (काँग्रेस) ओबीसी म्हणजे ओन्ली फॉर ब्रदर इन लॉ कमिशन आहे. त्याचबरोबर ज्यांची जात कोणाला माहिती नाही, तो जातीनिहाय जनगणेच्या गोष्टी करतायत. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र उत्तर द्यायला कोण उभं राहिलं ते सर्वांनी पाहिलं आहे असं अनुराग ठाकूर म्हणाले होते.