त्या अॅपचा वापर करून तब्बल ७ विद्यार्थिनींचा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आली समोर…….
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | MADHYA PRADESH | SIDHI DISTRICT | MAZOLI POLICE STATION | GIRLS STUDYING IN COLLEGE WERE RAPED BY LURING THEM WITH SCHOLARSHIPS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
आवाज बदलल्या जाणाऱ्या ॲपचा वापर करून काही मजूरांनी शासकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे आमिष दाखविले आणि त्यांच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रिजेश प्रजापती, त्याचे सहकारी राहुल प्रजापती, संदीप प्रजापती आणि लवकुश प्रजापती या चार लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी ब्रिजेश प्रजापती हा मजूर आहे. त्याने युट्यूबवरून आवाज बदलण्याच्या ॲपबद्दल माहिती मिळवली आणि या ॲपच्या माध्यमातून तो महाविद्यालयातील विद्यार्थीनींना जाळ्यात ओढत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिजेश प्रजापती हा त्याच्या सासरी मडवास या गावात राहून आरोपीने हा गुन्हा केला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
व्हॉट्सॲप ग्रुपवरून मुलींचे नंबर काढून….
या टोळीतील एक आरोपी त्याच महाविद्यालयात काही काळापूर्वी शिकत होता. तो महाविद्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून मुलींचे नंबर काढून मुख्य आरोपी ब्रिजेशला देत होता. आवाज बदलण्याच्या ॲपचा वापर करून सीधी जिल्ह्यातील संजय गांधी महाविद्यालयाच्या उच्चपदस्थ रंजना मॅडम यांच्या आवाजात विद्यार्थीनींना फोन केला जात होता. विद्यार्थीनींचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना शिष्यवृत्तीचे आमिष दाखवण्यात यायचे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थीनींना त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करण्यास सांगितले जात असे. यासाठी आपल्या मुलाच्या मित्राला कागदपत्र घ्यायला पाठवते, असे रंजना मॅडमच्या आवाजात आरोपी सांगायचे. ठरलेल्या ठिकाणी विद्यार्थीनी आल्यानंतर तिला मोटारसायकलवर बसून गुप्त स्थळी घेऊन जात असे. तिथे आरोपी विद्यार्थीनीवर बलात्कार करत.
स्त्रोत सोशल मिडिया
सात विद्यार्थीनींवर बलात्कार
सीधी जिल्ह्यातील मझोली पोलीस ठाण्यात एकेदिवशी महिलेचा निनावी फोन आला आणि या गुन्ह्याचा भांडाफोड झाला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचला आणि मोठ्या शिताफीने आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी सात विद्यार्थीनींवर बलात्कार केला असल्याची कबुली दिली आहे. आता या प्रकरणात एक-एक करून विद्यार्थीनी पुढे येत आहेत. त्यांनी चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.