शिक्षक विध्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारा हवा, या शिक्षकाने अल्पवयीन विध्यार्थिनीसोबत विनयभंग घडवला.शिक्षकावर गुन्हा दाखल.
TIMES OF AHMEDNAGAR

शिक्षकाचे काम मुख्यत्वे विद्यार्थ्याला माणूस म्हणून प्रेरित करणे आणि वाढवणे हे असते. शिक्षक हे फक्त टेपरेकॉर्डर नाहीत जे काहीतरी वाचतात आणि काही माहिती तुमच्यापर्यंत होहचवतात. शिक्षक म्हणजे एक अशी व्यक्ती आहे जी विद्यार्थ्याला विशिष्ट मार्गाने प्रेरित करून त्यांचे जीवन घडवत असते.परंतु काही शिक्षकांना विध्यार्थी घडवण्यामध्ये इच्छा नसते.काही शिक्षक हे संस्थाचालकांचे पंटर असतात, त्या शिक्षकांच्या डोक्यात फक्त राजकारण सुरु असते.काही शिक्षक रंगीला रतन असतात त्यांच्या डोक्यात रंगीले व्यसन असते,अशा बातम्या आपण ऐकत असतो.मात्र अल्पवयीन मुलीच्या बाबतीत एखादा शिक्षक एवढा वाईट विचार करू शकतो हे माणुसकीला काळिमा फसणार आहे.

अहमदनगर शहातील सावेडीतील येथील खासगी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. नगर शहरात राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी (वय १७) शहरातीलच एका विद्यालयात शिक्षण घेते. तसेच ती सोनानगर चौकातील खासगी लासेससाठी जात असते. बुधवारी दुपारी ती लासमध्ये गेली असता तेथे सत्यम कुटे हा एकटाच उपस्थित होता. त्याने फिर्यादीकडे प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीने शिक्षकाला नकार दिला. तरी देखील शिक्षकाने फिर्यादीचा हात पकडून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादीने शिक्षकाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून धावत-पळत घर गाठले. घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

काय आणि कसे घडले ?
१७ वर्षीय अल्पवयीन मुलीची एका शिक्षकानेच छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. शहरात राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी (वय १७) शहरातीलच एका विद्यालयात शिक्षण घेते. तसेच ती सोनानगर चौकातील खासगी लासेससाठी जात असते. बुधवारी दुपारी ती लासमध्ये गेली असता तेथे सत्यम कुटे हा एकटाच उपस्थित होता. त्याने फिर्यादीकडे प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली.पीडित मुलगी सोनानगर सावेडी येथे बुधवारी (दि. २७) दुपारी सोनानगर चौकातील खासगी लासेसमध्ये ही घटना घडली. सत्यम नवनाथ कुटे (मुळ रा. कुटे वस्ती, देडगाव ता. नेवासा, हल्ली रा. वैदुवाडी, सावेडी, नगर) असे छेडछाड करणार्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर हे प्रकरण तोफखाना पोलिसात गेले. पोलिसांनी पीडितेची फिर्याद नोंदवून घेत शिक्षकाविरोधात विनयभंग, पोसो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि. २७) दुपारी सोनानगर चौकातील खासगी लासेसमध्ये ही घटना घडली. सत्यम नवनाथ कुटे (मुळ रा. कुटे वस्ती, देडगाव ता. नेवासा, हल्ली रा. वैदुवाडी, सावेडी, नगर) असे छेडछाड करणार्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून कुटे विरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक जे.सी.मुजावर करीत आहेत.

शिक्षक.