TIMES OF AHMEDNAGAR
राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित खोसे आणि काँग्रेसचे किरण काळे आमने-सामने. नाव न घेता काळेंवर गंभीर आरोप करत हल्लाबोल.
अहमदनगर शहरातले घड्याळ आपल्या पुढील राजकीय भविष्याची चांगली वेळ दाखवत नाही.आपल्या राजकीय भविष्यासाठी घड्याळ बंद पडले आहे.असा विचार कदाचित काळेंनी केला असावा म्हणूनच वंचितच्या गाडीत बसून काळेंनी आपले भविष्य उज्वल करणारे हाथ शोधून काँग्रेसच्या हातात हात मिळवत नगरमध्ये अनेक हात जोडत शहरातील काँग्रेस पक्षाला बळकट केले.
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेले काळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.काही दिवसांपूर्वी शहरातील वकील हर्षद चावला यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. माध्यमांशी संवाद साधतांना चावला यांनी किरण काळे यांच्या नावाचा उल्लेख करत हल्लेखोरांनी माझ्यावर हल्ला केला असल्याचे सांगितले होते.मात्र आपण कोणत्याही प्रकारे या हल्ल्यात सहभागी नसल्याचे काळे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले होते.
आमदार जगतापांच्या मेंदूची तपासणी करावी.
वकील हर्षद चावला यांच्यावर झालेल्या हल्ल्यात चावालांनी किरण काळेंच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर काळेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली होती. कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची भेट घेतली होती.जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात काळेंनी अनेक बाबी स्पष्ट करत राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करत असतांना आमदार संग्राम जगताप यांच्या मेंदूची तपासणी खासदार सुजय विखे यांच्या कडून करून घ्यावी असा टोला यावेळी काळेंनी लगावला होता.
काळेंच्या टीकेला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे प्रथमच उत्तर दिले आहे. किरण काळे यांनी चावला प्रकरणात अभिजित खोसे सहभागी असल्याचे आरोप केल्यानंतर अभिजित खोसेंनी पत्रकार परिषद घेऊन काळेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलत असतांना खोसेंनी काळेंची पात्रताच काढली.शहर काँग्रेस संपविण्यासाठी माजी.मंत्री बाळासाहेब थोरातांनी काळेंना अध्यक्ष करून काँग्रेस संपविण्याचे षड्यंत्र केले असल्याचे खोसे म्हणाले.थोरातांचे शहरासाठी कोणतेही योगदान नसल्याचे आरोप देखील खोसेंनी केले. काळेंची अध्यक्ष पदावर निवड करणे हीच थोरातांची चूक आहे काळेंना अध्यक्ष नेमल्याने थोरातांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे सांगत खोसेंनी थोरातांचा मेंदू तपासणीचा सल्ला दिला आहे.
नगरला आले बेरोजगार काळे – खोसेंचे नाव न घेता फटकेबाजी.
माध्यमांशी बोलत असतांना काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण काळे यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अभिजित खोसे यांनी काळेंवर बेलगाम टीका केली आहे. बावळट माणसाची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली असल्याचे खोसे म्हणाले. शहरातील विकासकामांना खो घालत असल्याचे आरोप खोसेंनी केले आहेत.तरुणांना संघटीत करत असतांना काळेंनी नगरच्या तरुणांना रोजगाराचे स्वप्न दाखवले होते. त्यावर खोसे म्हणाले काळे स्वतः बेरोजगार आहेत. रोजगाराचे साधन म्हणून काळेंनी राजकारणाची निवड केलेली आहे. वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना अर्ज देऊन ब्लॅकमेलिंग करून पैसे मिळवायचा आणि त्यातून आपला उदरनिर्वाह चालवायचा अशा बद्धतीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरत चाललेले आहे. हा व्यक्ती नगरचा नाही. बाहेरून पोट भरायला आलेले काळे बेरोजगारावर बोलतात एखाद्याने खासगी कार्यक्रम घेतला तरी काळेंच्या पोटात दुखत असल्याचे खोसेंनी गंभीर आरोप केले आहेत.