अभिनेता सलमान खानची चार तास चौकशी, सलमान खान त्या प्रकरणाला वैतागला….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | ACTOR SALMAN KHAN | ACTOR ARBAAZ KHAN | ACTOR SALMAN KHAN AND HIS BROTHER ARBAAZ KHAN'S STATEMENT HAS BEEN RECORDED IN THE SHOOTING OUTSIDE GALAXY APARTMENTS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मुंबई क्राइम ब्रांचने वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्स बाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी अभिनेता सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांचा जबाब नोंदवला आहे. गँगस्टर्सकडून सतत निशाण्यावर असल्याने सलमानने पोलिसांसमोर जबाब नोंदवताना हताश होऊन निराशा व्यक्त केली आहे. ज्या गुन्ह्यासाठी मी आधीच खूप त्रास सहन केला आणि विविध न्यायालयांमध्ये दंड भरला आहे, असा दावा करत त्यावरून सतत लक्ष्य केल्याप्रकरणी सलमानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एप्रिल महिन्यात सलमानच्या घराबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केला होता. लॉरेन्स बिष्णोईच्या भावाने या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. १९९८ मध्ये हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जोधपूरजवळ काळवीट शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे. या शिकार प्रकरणापासून सलमानला सतत बिष्णोई गँगपासून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
पोलिसांनी दोघा भावंडांना विचारले १५० हून अधिक प्रश्न….
मुंबई क्राइम ब्रांचच्या एका अधिकाऱ्यासह चार सदस्यीय टीमने ४ जून रोजी सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या वांद्रे इथल्या घरी गेले होते. यावेळी दोघा भावंडांची सहा तास चौकशी करण्यात आली आहे. या जबाबात सलमानने पोलिसांना सांगितले की तो गोळीबाराच्या घटनेच्या आदल्या रात्री एका पार्टीनंतर उशिरा घरी पोहोचला होता. पहाटेच्या सुमारास बुलेटच्या आवाजाने त्याला जाग आली होती. नंतर समजले की त्याच्याच घराच्या दिशेने हा गोळीबार झाला होता आणि त्यातील एक गोळी बाल्कनीच्या भिंतीला लागली होती. गोळीच्या आवाजाने धक्क्यातून मी जागा झालो आणि बाल्कनीमध्ये तपासण्यासाठी गेलो होतो. बाहेर पाहिले तर मला कोणीही दिसले नाही. असे सलमानने पोलिसांना सांगितले आहे. गोळीबाराच्या घटनेवेळी अरबाज त्याच्या जुहूमधल्या घरात होता. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या सलमानला येत असल्याची माहिती असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. यावेळी पोलिसांनी सलमानची तीन तास आणि अरबाजची दोन तास चौकशी केली आहे. पोलिसांनी दोघा भावंडांना १५० हून अधिक प्रश्न विचारले आहेत. ज्यावेळी घराबाहेर गोळीबार झाला, तेव्हा सलमानचे वडील सलीम खानसुद्धा घरात उपस्थित होते. मात्र त्यांच्या वयोमानाचा विचार करता त्यांची चौकशी करण्यात आली नाही. मात्र भविष्यात तपासासाठी महत्त्वाचे वाटल्यास त्यांचाही जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. तर अनुज थापन आणि आणखी एका व्यक्तीला पंजाबमधून ताब्यात घेण्यात आले होते. यापैकी अनुजने पोलीस कोठडीतच आत्महत्या केली आहे.