हे हि वाचा :
आरोपी कोण आहेत ? कोणत्या आरोपीचे नाव कोणी घ्यायला सांगितले आणि का ? केडगाव हल्ल्याचे थेट मुकुंदनगर कनेक्शन पण कनेक्शन डी.एस.पी.चौकात का थाबले ? कोण आहे मास्टरमाइंड वाचा सायंकाळच्या सत्रात.
२०२३ हे वर्ष अहमदनगर शहराला अत्यंत वेदनादायी वर्ष ठरले आहे. खून,चोऱ्या,दरोडे,बलात्कारासारखे अनेक भयंकर गुन्हे या वर्षी शहरात घडले आहे.नगर शहराला दहशतीत ठेणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. मात्र प्रशासनाला जनतेचे काहीही घेणेदेणे नसल्याचे त्यांच्या वागण्यावरून दिसून येत आहे.नगर शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दल देखील अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. काही पोलीस निरीक्षक त्यांच्या हद्दीला गुन्हेगारी मुक्त करण्याच्या तयारीत असतात वेळप्रसंगी ते ” कर हर गुन्हेगार फते ” या मिशन वर देखील निघतात,परंतु ते दक्षिणात्य चित्रपटासारखे घडते ” यहा तेरे इलाके का फैसला भी मै हि करुंगा,ओर मेरे इलाके का फैसला भी मै हि करुंगा ” अशी गत झाली आहे. मुळात काहींना गुन्हेगारीमुक्त शहर नको असल्याचे समजते.
जिल्ह्यात कायद्याचा धाक कमी होऊ लागला असून गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळे अनेक खळबळजनक घटना सध्या नगर शहर परिसरात घडू लागल्याचेच समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित होत आहे. मागील अनेक महिन्यांपासून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळेल असे कृत्य शहरात घडत आहे. मात्र या घटनांना पोलीस अधीक्षक व पोलीस महासंचालक जास्त गांभीर्याने घेत नसल्याचे बोलले जाते. लक्ष्मी दर्शनात व्यस्त असलेल्यांना जनतेचे काय पडलंय असा संतप्त सवाल सध्या तरूणाई खासगीत उपस्थित करत असल्याचे समजते.
हे फक्त मोजकेच घडलेले गुन्हे…. अजून अशे अनेक गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंद आहेत.
अहमदनगर शहरात बालिकाश्रम रोड येथे मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ओंकार भागानगरे हा जागीच ठार झाला होता तर दुसरा शुभम पडोळे याच्या डोक्यात तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
अहमदनगर शहरात सावेडी परिसरात अंकुश चत्तर या इसमाचा देखील खून करण्यात आला होता.
नगर तालुक्यातील इमामपूर येथील हनुमंत दामोधर आवारे याचे अपहरण झाल्यानंतर त्याचा मृतदेह शेंडी शिवारात आढळून आला होता. खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून समजली.
एमआयडीसी भागातील सह्याद्री चौक परिसरामध्ये एका युवकाचा खून झाल्याची घटना घडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे हा खून एका शुल्लक कारणावरून करण्यात झाला होता. प्रवीण कांबळे असे मृत युवकाचे नाव होते. तर याप्रकरणी मयत प्रवीण कांबळेंच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.
महिलेने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने कोळगाव ता. श्रीगोंदा)येथील विश्वनाथ भापकर याने आधी तिच्या पतीचे चारचाकी वाहन पेटवून दिले. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने थेट मित्राच्या मदतीने तिच्या भावाला श्रीगोंदा रोडवरील चिखली घाटाच्या शेजारील जंगलात अतिप्रमाणाम दारू पाजून कुकडी कालव्याच्या पाण्यात फेकून देत त्याचा खून केला.
मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य याच्यावर जमावाने हल्ला केला होता. उपचारासाठी त्याला संगमनेर येथे हलवण्यात आले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान जमावाच्या हल्ल्यात अण्णा वैद्यचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
श्रीरामपूर येथे कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसालाच मारहाण केल्याची घटना समोर आली होती. कारवाईसाठी आलेल्या पोलिसावरच जुगारींनी हल्ला केल्याचे समोर आले होते. तब्बल दहा लोकांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. दरम्यान ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसाची सुटका केल्याने तो बचावला. हवालदार रवींद्र खळेकर असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून ते तालुका पोलिस ठाणे अंतर्गत पढेगावचे अंमलदार म्हणून कार्यरत आहेत.
शहरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून पोलीस त्या मुलींचा शोध घेत आहे.
अशा अनेक मोठमोठ्या घटना शहरात घडत आहेत.मात्र पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारे गुन्हेगारीला आवळायला अपयशी ठरले आहे. अनेक खून होतांना जनता पहात आहे. शहरातील जनता व्यापारी वर्ग किती सुरक्षित आहे हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. काल (दी.२५ ) रोजी शहरातील एका वकिलावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला या हल्ल्यात वकील हर्षद चावला हे गंभीर जखमी झाले. हल्ला करणाऱ्यांना एवढी डेरिंग कोण देत असा प्रश्न असतांना चावला यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे.
चावालांनी केला पोलिसांवर आरोप :
शहरातील अवैध धंद्यांना मुळात सर्वच नागरिक वैतागले आहेतच परंतु तक्रार करायची कशी ? तक्रार केल्यास मारहाण होते गुंड प्रवृत्तीचे लोकं मारहाण करतील या भीतीपोटी अनेक नागरिकांना तोंडाला पट्टी लाऊन एखादा येईल आणि आपल्याला संकटातून मुक्त करील अशी अपेक्षा बाळगून जगावे लागते. एखाद्या व्यक्तीने निर्भीडपणे तक्रार केली तर त्याचा चावला होतो. हे संपूर्ण नगरकरांनी पहिलेच पोलिसांना अवैध्य धंद्यांची माहिती दिल्याबद्दल चावालांवर हल्ला झाला. विशेष म्हणजे पोलिसांना माहिती देणाऱ्यांची नावेच पोलीस गुंडांना सांगतात हे नवलच. मी अवैध्य धंद्याची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी माझे नावच गुंडांना सांगितले असल्याचा आरोप चावालांनी थेट पोलिसांवर केला.
पोलिसांचे व हॉटेल वैष्णवराजचे काय कलेक्शन ?
हर्षद चावला नामक वकिलावर हल्ला झाला या वेळी हॉटेल वैष्णवराज,केडगाव येथील अवैध धंद्यांच्या तक्रारी मी पोलिसांना केल्या होत्या त्याचा राग मनात धरून माझ्यावर हल्ला झाल्याचे चावला यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले होते.एका पोलीसवाल्याने मी तक्रार करत असल्याची माहिती हल्लेखोरांना दिली असल्याचे देखील चावला यांनी बोलतांना सांगितले. पोलिसांच्या कामाची माहिती देणाऱ्याची माहिती पोलिसांनी गोपनीय ठेवणे गरजेचे असते. या पोलीसवाल्याने कोणतीही माहिती गोपनीय न ठेवता तक्रारदाराचे नावच हल्लेखोरांना सांगितले.या पोलिसांचे व हल्लेखोरांचे काय संबंध आहेत हे वरिष्ठानी तपासणे गरजेचे आहे. हा पोलीसवाला त्या धंद्यांना पाठीशी घालतोय का त्याचे कारण काय ? त्याचे काही कलेक्शन आहे का हे देखील तपासणे गरजेचे असल्याचे नागरिक घास्गीत सांगतात.
आरोपी कोण आहेत ? कोणत्या आरोपीचे नाव कोणी घ्यायला सांगितले आणि का ?
केडगाव हल्ल्याचे थेट मुकुंदनगर कनेक्शन पण कनेक्शन डी.एस.पी.चौकात का थाबले ?
कोण आहे मास्टरमाइंड वाचा सायंकाळच्या सत्रात.
Hi
I was doing some research for a client. As I was browsing through your website, I ran into an issue accessing timesofahmednagar.com.
I know it can be difficult to keep track of every aspect of a website.
For my own needs, I often turn to tools like https://websitecheckhealth.com to check I’m getting the most out of my health-related websites. It offers a comprehensive report at no cost.
If you need any assistance in this area, feel free to reach out.
Warm regards, Dora
Hi,
I was just browsing your website and I came up with a great plan to re-develop your website using the latest technology to generate additional revenue and beat your opponents. timesofahmednagar.com
I’m an excellent web developer capable of almost anything you can come up with, and my costs are affordable for nearly everyone.
I would be happy to send you “Quotes”, “Proposal” Past work Details, “Our Packages”, and “Offers”!
Thanks in advance,
Nishant (Business Development Executive)