भारतरत्न इंदिरा गांधींचे नाव हटवून तारकपूरला मटका बुकीचे नाव. ?
महासभेत इंदिरा गांधींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकवटला,तिन्ही नगरसेवकांचे शहरात कौतुक.
अहमदनगर महानगरपालिकेची महासभा बुधवार (दि.२०) रोजी पार पडली.हि सर्वसाधारण सभा अंतिम सर्वसाधारण सभा असल्याचं बोलले जात होते. कारण दि. १ जानेवारीपासून अहमदनगर महापालिकेत प्रशासकीय राज लागू होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्व नगरसेवकांचं लक्ष लागलं होतं. या सभेत आयत्या वेळेच्या विषयांसह इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. ही सभा संपत आली, तेव्हा एक गंमतीशीर विषय अहमदनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आला. अहमदनगर शहरात असलेल्या तारकपूर परिसरात इंदिरा कॉलनी नावाची एक नागरी वसाहत आहे.या वसाहतीमध्ये सुमारे दीडहजार नगर राहत आहेत.त्यांच्या अनेक अडचणी आहेतच,अनेकदा नगरसेवकांना संपर्क केला असता नगरसेवक गायब असल्याच्या चर्चा आपण ऐकत आलो आहोत.
तृतीयपंथी समाजाच्या काजल गुरूंनी नगरसेवकांवर २५ पैसे बक्षिश जाहीर केले होते.
तारकपूर कॉलनीमध्ये अनेक अडचणींचा सामना तेथील रहिवास्यांना करावा लागतो.परिसरातील घाणीचे साम्राज्य,कुत्र्यांचा त्रास,पाण्याच्या समस्या,अनेक अडचणींसाठी नागरिक नगरसेवकांचा शोध घेत होते.अशातच या अडचणींना वैतागून तृतीयपंथी समाजाच्या अध्यक्ष काजळ गुरु यांनी नगरसेवकांनवर २५ पैसे (चाराने) बक्षिश जाहीर केले होते.
तारकपूर येथील इंदिरा कॉलनीचं नाव बदलून एकेकाळी मटका बुकी असलेल्या एका व्यक्तीचं नाव या इंदिरा कॉलनीला देण्याबाबतच्या विषयाला मंजूरी द्यावी, असा ठराव महापालिकेसमोर आला. महापालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी जबाबदारीचं भान ठेवत हा विषय फेटाळून लावलाच. पण इंदिरा गांधी कॉलनी असं नाव देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. देशासाठी शहीद झालेल्या इंदिरा गांधीचे नाव काढून त्या ठिकाणी एका मटका बुकीचं नाव देण्याचा ठराव अहमदनगरच्या महापालिकेत येतोच कसा, हाच या सर्वसाधारण सभेत खरं तर चर्चेचा विषय झाला. दरम्यान, हा ठराव मांडणाऱ्या नगरसेवकाने गुपचूप सभागृहातून काढता पाय घेतला.
अहमदनगर शहरातील तारकपूर येथील एका कॉलोनीला देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न स्व. इंधीरा गांधी यांचे नाव दिलेले आहे. इंदिरा कॉलनी असे या कॉलनी चे नाव आहे.या प्रभागामध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) अहमदनगर महानगर पालिकेचे नगरसेवक तथा अहमदनगर शहरातील नावाजलेल्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचे चिरंजीव आहेत. त्यांनी भारत देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न स्व.इंधीरा गांधी यांचे नाव असलेल्या कॉलनी ला इंधीरा गांधी यांचे नाव हटवून मटकाबुकी लालू मद्यान याचे नाव देण्याचा थेट प्रस्तावाच महानगर पालिकेच्या महासभेत आणला होता.
भारतरत्न.स्व.इंदिरा गांधी यांच्या तुलनेत लालू मद्यानचे काम काय ?
तारकपूर येथील इंदिरा कॉलनी चे नाव बदलून लालू मद्यानचे नाव देणाच्या प्रस्तावावर महासभेत चांगलाच धिंगाणा झालेला पाहायला मिळाला.राज्यात शिवसेनेच्या (ठाकरे गट) विरोधात असलेला राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) स्थानिक पातळीवर देखील प्रामाणिकपणे आपली भूमिका पार पाडत आहे.महापालिकेचे बिरोधी पक्षनेते संपत बारस्कर,नगरसेवक कुमार वाकळे,नगरसेवक सागर बोरुडे,यांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) त्या नगरसेवकाचा चांगलाच समाचार घेतला आहे.इंदिरा गांधीच्या तुलनेत लालू मद्यानचे काही चांगले काम असल्यास मला देखील सांगा म्हणजे मला प्रेरणा घेता येईल असा खोचक टोला देखील संपत बारस्कर यांनी महासभेत लगावला आहे.