एका चोरट्याने चक्क लष्करी जवानालाच लावला चुना,लष्करी जवानाच्या क्रेडीट कार्डचा डाटा चोरून जवानाला घातला १ लाखांना गंडा.
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | ARMY PERSONNEL | FRAUD OF MILITARY MAN | FRAUD TOOK PLACE IN BHINGAR CITY | A CASE HAS BEEN REGISTERED AT BHINGAR POLICE STATION | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
ऑनलाईन फसवणुकीबद्दल प्रशासनाच्यावतीने वारंवार सूचित केले जाते,मात्र गुन्हेगारी काही थांबत नाही. असाच एक प्रकार शहरात घडला आहे. भिंगार परिसरात लष्करी वसाहतीत राहणाऱ्या एका लष्करी जवानाच्या क्रेडीट कार्डचा डाटा चोरून सुमारे १ लाख रुपयांची खरेदी करून ऑनलाईन आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सोमवारी (दि.१५) दुपारी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि वाय. जे. यक्षित (मूळ रा. पुरूमलापल्ली, आंध्रप्रदेश, हल्ली रा. एम आय सी, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने एसबीआय बँकेचे क्रेडीट कार्ड घेतलेले होते. मात्र त्यावरून कोणतीही खरेदी केली नाही, किंवा कोणालाही ओटीपी सांगितलेला नाही तरीही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या क्रेडीट कार्डचा डाटा चोरून त्याद्वारे सुमारे १ लाख रुपयांची खरेदी करून ऑनलाईन आर्थिक फसवणुक केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भा.दं. वि. कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.