TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर जिल्हा हा दोन लोकसभा मतदारसंघात विभागाला आहे उत्तर नगर आणि दक्षिण असे दोन लोकसभा मतदारसंघ या जिल्ह्यात आहे. १२ विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत.
सहकाराचा जिल्हा अशी उत्तर व दक्षिण मतदारसंघाची ओळख आहे.अहमदनगर जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघ विभागाला गेला आहे दक्षिण आणि उत्तर नगर असे दोन लोकसभा मतदारसंघ या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून पत्ता कट झाल्याने विखे यांनी आपला मोर्चा भाजपाकडे वळवला होता.सुजय विखे यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपला मजबूत स्थान मिळवून दिलं आहे.यापूर्वी देखील या लोकसभा मतदारसंघात भाजपला स्व. दिलीप गांधी यांच्या माध्यमातून खासदार लाभले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा २८१४७४ मतांनी पराभव केला होता.
राष्ट्रवादीचे आमदार मात्र खासदार भाजपचा
जरी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जास्त असले, तरी खासदार मात्र भाजपचाच होत असल्याचं अनेक वेळेला पाहायला मिळालं. १९९९ ते २०१९ या काळात दिलीप गांधी यांच्या रूपाने तीन वेळा आणि सुजय विखेंच्या रूपाने एक वेळा असे चार वेळा या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या खासदाराने प्रतिनिधित्व केले आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अहमदनगर शहर,श्रीगोंदा, पारनेर ,शेवगाव- पाथर्डी कर्जत- जामखेड, राहुरी असे विधानसभा मतदारसंघ आहेत. दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ०४, भाजपचे ०२ आणि विधान परिषदेवर भाजपचे ०१ असे आमदार आहेत. एकूणच बघितलं तर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बलाबल जास्त दिसून येते. मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने राष्ट्रवादीतील दोन आमदार हे अजित पवार गटात गेले असून दोन आमदार शरद पवार यांच्या गटात आहेत.
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढत
अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा भाजप आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळते. मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद विभागली आहे. कोणत्याही इच्छुक उमेदवाराकडून तयारी सुरू झालेली नाही. त्यामुळे भाजप खासदार सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीत कोण उमेदवार असणार याची आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा लढवण्यास कोण इच्छुक ?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सध्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार याबाबत स्पष्टता आलेली नाही. कधी राष्ट्रवादीचे कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नावाची चर्चा होत असते तर कधी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा होत असते. मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम देत आमच्या दोघांपैकी कोणीही उमेदवार नसेल लवकरच उमेदवार कोण असेल याची गोड बातमी देऊ असं काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. महायुतीत एकत्रित असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यात आणि विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यात राजकीय संघर्ष असल्याचे चित्र आहे. आ.निलेश लंके यांच्या नावाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर निलेश लंके हे अजित पवार गटांमध्ये सहभागी होत महायुतीमध्ये सत्तेत आले. तर दुसरीकडे निलेश लंके यांची पत्नी राणी लंके यांच्याकडून वारंवार आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केलं जातंय.
त्यामुळे भविष्यात आ.निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटात सहभागी होऊन सुजय विखे यांच्याविरोधात दक्षिण नगर लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा मतदारसंघात आहे. जर आमदार निलेश लंके यांनी आपली पत्नी राणी लंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरल्या तर सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखे किंवा आई शालिनी विखे यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच भाजप खासदार सुजय विखे यांना पक्षांतर्गत विरोधाला देखील सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.