काळे यांना अटक करा ; खोटा गुन्हा दाखल करून जर मला अटक करायची असेल तर मी त्या संघर्षाला सामोरे जायला तयार आहे – किरण काळे
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | CONGRESS CITY DISTRICT PRESIDENT KIRAN KALE | CITY DEPUTY SUPERINTENDENT OF POLICE AMOL BHARTI | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचे दिवस जसजसे जवळ येत आहेत तसतसे राजकीय वातावरण चिघळत चालले आहे. काल सोमवार (२९ एप्रिलला) एका खासगी हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकला आणि माजी.आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि वाद चिघळला,चक्क ६० हजार रुपयांचा रोख रक्कम मिळाल्याने पोलिसांनी या युवकांना ताब्यात घेतले.आणि या युवकांसाठी अनेक राजकीय मंडळी मैदानात उतरले.
स्त्रोत.सोशल मिडिया
किरण काळेंचा शहर पोलीस उपाधीक्षकांनाच इशारा ?
शहरात एका खासगी हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी महाविकास आघाडीचे तथा कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या कार्यकर्त्यांसाठी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. शहर पोलीस उपाधीक्षक आणि काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. राजकीय दबावातून निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र असल्याचा काँग्रेसने आरोप केला.
स्त्रोत.सोशल मिडीया.
हुकूमशाही वागणे संविधान विरोधी आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे.- काळे
कोतवाली पोलीस ठाण्यात मध्यरात्री उशिरा हाय व्होल्टेज नाट्य पाहायला मिळाले.शहरातील एका खाजगी हॉटेलवर धाड मारून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. ही घटना समजताच शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गर्दी केली. यावेळी शहर पोलीसउपाधीक्षक अमोल भारती आणि किरण काळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी भारती यांनी काळे यांना अटक करा असे फर्मान सोडले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते संतापले. काळे यांनी कोतवाली पोलीस निरीक्षकांच्या दालनातच जमिनीवर बैठक मांडून मी कोणताही गुन्हा केलेला नाही. पण खोटा गुन्हा दाखल करून जर मला अटक करायची असेल तर मी त्या संघर्षाला सामोरे जायला तयार आहे. मात्र हे हुकूमशाही वागणे संविधान विरोधी आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही त्याचा निषेध करतो असे म्हणत भारती यांना चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी घडलेला प्रकार काळे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितला.