“विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या जेवढ्या सभा होतील तेवढे आम्हाला बहुमत मिळेल , म्हणून त्यांचे आभार”-शरद पवारांचा मोदींना खोचक टोला….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | PRIME MINISTER NARENDRA MODI | NATIONALIST CONGRESS PRESIDENT SHARAD PAWAR | SHARAD PAWAR'S STATEMENT AGAINST MODI IN THE JOINT PRESS CONFERENCE HELD BY THE MAIN LEADERS OF MAHAVIKAS AGHADI | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या आणि त्यांचा एक रोड शो देखील झाला होता. त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना फायदाच झाला आहे. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या जेवढ्या सभा होतील तेवढा फायदा आम्हाला होईल. असा खोचक टोला शरद पवार यांनी मोदी यांना लगावला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
स्त्रोत सोशल मिडिया
शरद पवारांनी मानले मोदींचे आभार ?
राज्यात मोदींच्या जेवढ्या जास्त सभा झाल्या आहेत तिथे आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांचे मला विशेष आभार मानावे लागतील. विधानसभेला त्यांनी अजून सभा घेतल्या तर आमच्याच फायद्याच्या ठरतील असा खोचक टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. तर मतदारांनी मतांच्या माध्यमातून संदेश दिल्याचे पवारांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे. तसेच सोडून गेलेल्यांना परत घेणार नसल्याचेही शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. जे सोडून गेले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या जेवढ्या सभा होतील तेवढे आम्हाला बहुमत मिळेल. म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देतो असे शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. तर धार्मिक धृवीकरण झाले, पण त्याला यश मिळाले नसल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.